अमर शैलामुंबई : साडेचार महिन्यांपासून बंद असलेली संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता) ते चेंबूर मोनोरेल लवकरच पुन्हा धावणार आहे. तिची मार्गिका सुरू करण्यासाठी आवश्यक इंडिपेंडंट सेफ्टी असेसमेंट (आयएसए) ही सुरक्षा तपासणी सुरु केली आहे, अशी माहिती ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्याने दिली.
मोनोरेलला बिघाडांचे ग्रहण लागल्याने आणि मार्गिकेवर नवी यंत्रणा बसविण्यासाठी दि. २० सप्टेंबरपासून ती अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर जुनी यंत्रणा काढून नवी बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तसेच मोनोरेलच्या ताफ्यात नव्या दहा गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यांच्या चाचण्याही जवळपास पूर्ण झाल्या आहेत. मोनोरेल पुन्हा सुरू करण्यासाठी एमएमआरडीएने गेल्या आठवड्यात आयएसए सुरक्षा तपासणी सुरू केली आहे. आणखी काही दिवस ही तपासणी चालेल. सुरक्षेच्या खात्रीनंतर वाहतूक सुरू करण्यासाठी प्रमाणपत्र मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चालवण्यासाठी कंत्राटदार नेमणार मोनोरेलचे संचालन आणि देखभाली करण्यासाठी कंत्राटदार नेमला जाणार आहे. यासाठी पॉवर मेक प्रोजेक्ट्स कंपनीने लघुत्तम २९६ कोटी रुपयांची निविदा दाखल केली आहे. या कंपनीला मोनोरेल चालविण्याचे कंत्राट मिळणार आहे. कंत्राटदाराला पाच वर्षांसाठी संपूर्ण मोनोरेल मार्गिका चालवावी लागणार आहे. यामध्ये मोनोचे परिचालन, स्थानक व्यवस्थापन, डेपो हाताळणी, गाड्यांची देखभाल दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.
सीएमआरएस तपासणीसाठी प्रस्तावमोनोरेलची सीएमआरएस तपासणीही केली जाणार आहे. त्यासाठी निवृत्त सीएमआरएसची इंडिपेंडंट इंजिनिअर म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी परवानगीचा प्रस्ताव गेल्या महिन्यात राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्याला अद्याप मान्यता मिळाली नाही. मान्यता मिळाल्यानंतर निवृत्त सीएमआरएस अधिकाऱ्यांमार्फत मोनोची तपासणी सुरू होईल. सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाल्यानंतर राज्य सरकारची परवानगी घेऊन मोनोरेल सुरू केली जाईल, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.
Web Summary : Mumbai's monorail is poised to resume operations after safety checks. The Chembur- সাত রাস্তা route undergoes independent safety assessment after system upgrades and new trains. A contractor will be appointed for operation and maintenance. CMRS inspection is also proposed before reopening.
Web Summary : मुंबई मोनोरेल सुरक्षा जांच के बाद फिर से शुरू होने को तैयार है। चेंबूर-सात रास्ता मार्ग पर सिस्टम अपग्रेड और नई ट्रेनों के बाद स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन किया जा रहा है। संचालन और रखरखाव के लिए एक ठेकेदार नियुक्त किया जाएगा। खुलने से पहले सीएमआरएस निरीक्षण भी प्रस्तावित है।