वडाळा आगार ते चेंबूर स्थानकादरम्यान रविवारी सकाळी मोनोरेलची सेवा राहणार बंद

By सचिन लुंगसे | Published: March 23, 2024 05:19 PM2024-03-23T17:19:17+5:302024-03-23T19:12:54+5:30

२५ मार्च रोजी वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यान १ तासांचा अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. तर  वडाळा आगार ते संत गाडगे महाराज चौक स्थानका दरम्यान १८ मिनिटांच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत.

Monorail service will be suspended between Wadala Agar and Chembur station on Sunday morning | वडाळा आगार ते चेंबूर स्थानकादरम्यान रविवारी सकाळी मोनोरेलची सेवा राहणार बंद

वडाळा आगार ते चेंबूर स्थानकादरम्यान रविवारी सकाळी मोनोरेलची सेवा राहणार बंद

मुंबई : मोनोरेलच्या नियमित देखभाल दुरुस्ती अंतर्गत महत्त्वाच्या स्थापत्य दुरूस्तीच्या कामासाठी २४ मार्च रोजी वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यानची सेवा सकाळी बंद राहणार असून रात्री ८ नंतर १ तासांचा अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू होणार आहे. तर संत गाडगे महाराज चौक ते वडाळा आगार या स्थानकां दरम्यानची सेवा मात्र सुरळीत राहणार आहेत. या फेऱ्या १८ मिनिटांच्या अंतराने सुरू राहणार असून रविवारी मोनोच्या एकूण ११४ फेऱ्यांचा माध्यमातून प्रवाशांना सेवा पुरविण्यात येणार आहे.

२५ मार्च रोजी वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यान १ तासांचा अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. तर  वडाळा आगार ते संत गाडगे महाराज चौक स्थानका दरम्यान १८ मिनिटांच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत.  या प्रमाणे सोमवारी मोनोच्या एकूण १४७ फेऱ्यांचा माध्यमातून प्रवाशांना सेवा पुरविण्यात येणार आहे. नागरिकांना विनव्यत्यय प्रवास करता यासाठी सर्व यंत्रणांच्या देखभाल दुरुस्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. मोनोरेलची नियमित देखभाल दुरुस्तीची कामे पार पाडत असून प्रवाशांचा सुरक्षित आणि आरामदायक प्रवास सुनिश्चीत करत आहोत.  मुंबई मोनोरेलच्या प्रवाशांना प्रवासादरम्यान होणार व्यत्यय टाळण्याच्या दृष्टिकोनातून सदर देखभाल दुरुस्तीचे काम हे सुट्टीच्या दिवशी हाती घेण्यात आले आहे. तसेच २६ मार्च पासून मोनोरेलची सेवा पूर्ववत करण्यात येणार आहे. 

 

Web Title: Monorail service will be suspended between Wadala Agar and Chembur station on Sunday morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.