मुंबई : तांत्रिक बिघाड आणि अत्यल्प प्रवासी संख्या या कारणांमुळे अनिश्चित काळासाठी मोनेरेल बंद करण्यात आली. या मोनोरेल मार्गावर आता नव्या गाड्यांच्या चाचण्या महामुंबई मेट्रो संचलन मंडळाने सुरु केल्या आहेत. या गाड्या लवकरच प्रवासी सेवेत दाखल होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. एमएमएमओसीएल अर्थात महामुंबई मेट्रो संचलन मंडळाने शनिवारी या मार्गावर नवी गाडी चालवून चाचण्या सुरू केल्या.
मोनोरेलच्या गाड्या जुन्या झाल्याने तसेच वारंवार तांत्रिक बिघाडामुळे अपघात घडत असल्यामुळे मोनो मार्गिकेवर गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी एमएमआरडीएने १० नव्या गाड्या खरेदी केल्या त्यातील आठ गाड्या एमएमआरडीए ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या गाड्यांची चाचणी पूर्ण करून त्या प्रवासी सेवेत आणल्या जाणार आहेत. या मार्गिकेसाठी नवीन सीबीसीटी यंत्रणा बसविली जाणार आहे. नव्या गाड्या मार्रावर आल्यानंतर दर ५ मिनीटांनी एक गाडी धावेल असा विश्वास एमएमएमओसीएलने व्यक्त केला आहे.