मोनो-मेट्रोचे वेळापत्रक मोबाइलवर

By Admin | Updated: July 12, 2014 00:41 IST2014-07-12T00:41:43+5:302014-07-12T00:41:43+5:30

एम-इंडिकेटर या मोबाईल अॅप्लीकेशनमध्ये आता मोनो, मेट्रो आणि हवामानाचीही माहिती देणा:या फीचर्सचाही समावेश झाला आहे.

Mono-Metro Schedule on Mobile | मोनो-मेट्रोचे वेळापत्रक मोबाइलवर

मोनो-मेट्रोचे वेळापत्रक मोबाइलवर

मुंबई : मुंबईतील रेल्वे, बस आणि टॅक्सीसारख्या महत्त्वांच्या वाहतूक सेवेविषयी माहिती पुरवणा:या एम-इंडिकेटर या मोबाईल अॅप्लीकेशनमध्ये आता मोनो, मेट्रो आणि हवामानाचीही माहिती देणा:या फीचर्सचाही समावेश झाला आहे. मात्र या नव्या फीचर्सचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांना सोमवार्पयत कळ काढावी लागणार आहे. एम-इंडिकेटरचे निर्माता अभियंता सचिन टेके यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 
टेके म्हणाले, ‘ज्या मोबाइल युजर्सने याआधी एम-इंडिकेटर डाऊनलोड केले असेल, त्यांना सोमवारी केवळ ते अपग्रेड करावे लागणार आहे.  एम-इंडिकेटरमध्ये आता मोनो, मेट्रो, पालिकेची आपत्कालीन यंत्रणा, प्रॉपर्टी आणि फेरी सव्र्हीस हे पाच नवे फीचर्स लोड करण्यात आले आहेत.’
मोनो व मेट्रोच्या फीचरमध्ये वेळापत्रकासह सुधारित दरपत्रकही नागरिकांना पाहता येणार आहे. शिवाय मोनो व मेट्रोबाबत कोणतीही तक्रार असल्यास ती या अॅपच्या माध्यमातून नोंदवता येणार आहे. तक्रारदाराने नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत प्रशासन त्यांना त्याच मोबाइलवर त्याचे उत्तरही पाठवणार आहे. याशिवाय पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणोच्या फीचरमध्ये नागरिकांना हवामान, भरती आणि ओहोटीची माहिती मिळणार आहे. त्यामुळे आद्र्रता, अतिवृष्टी, तापमान यांची इंत्थभूत माहिती या नव्या फीचरमध्ये मिळणार असल्याचे टक्के यांनी सांगितले.  महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या 11 फीचर्ससह नव्या 5 फीचर्समधील काही फीचर्स हे इंटरनेट कनेक्शन नसताना म्हणजेच ऑफलाइन असतानाही पाहता 
येतील. (प्रतिनिधी)
 
फेरी या नव्या फीचरमुळे नागरिकांना जलवाहतुकीबाबतची माहिती मिळवता येईल. त्यात गोराई जेट्टी ते गोराई खाडी व एस्सलवर्ल्ड, मढ जेट्टी ते वर्सोवा, गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा व मांडवा जेट्टी, भाऊचा धक्का ते रेवस, मोरा ते मांडवा जेट्टी, अर्नाळा ते अर्नाळा किल्ला, नायगाव जेट्टी ते पंजू बेट अशा मुंबईभोवतीच्या फेरीबोटसेवेची माहिती मिळणार आहे.

 

Web Title: Mono-Metro Schedule on Mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.