Join us
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब, 30 ते 40 कर्मचाऱ्यांच्या खात्यातून पैसे वळविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 12:36 IST

शासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतो आहे.

मुंबई- शासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतो आहे. मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, शासकीय मुद्रणालय या विभागातील ३० ते ४० कर्मचाऱ्यांच्या खात्यातून प्रत्येकी १५ ते 80 हजार रुपयांप्रमाणे लाखो रूपये वळते झाल्याची धक्कादायक माहिती लोकमतच्या हाती आली आहे. दरम्यान या प्रकरणी, मुंबईतील मरीन लाइन्स व ठाण्यातील मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे, मात्र अद्याप गुन्हा नोंद केला नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बँक ऑफ इंडिया व अँक्सिस बँकेच्या खात्यातील हे पैसे काढल्याची माहिती मिळते आहे. गुडगाव येथील एटीएममधून बहुतेक कर्मचाऱ्यांचे पैसे काढण्यात आले असल्याचं समजतं आहे. रविवारपासून कर्मचाऱ्यांच्या खात्यातील पैसे गायब होत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आपल्या खात्यातूनही पैसे वळते होणार नाहीत ना? अशी भीती इतर शासकिय कर्मचाऱ्यांना वाटत आहे.