लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुणालाही ओटीपी किंवा लिंक शेअर न करताही गोवंडीतील एका व्यावसायिकाच्या खात्यातून साडेपाच लाख रुपये गायब झाले. या प्रकरणी नेहरूनगर पोलिस तपास करीत आहेत.
गोवंडी - शिवाजीनगचे रहिवासी असलेले व्यापारी मोहब्बद अफरोज अयुब कुरेशी (४०) यांच्या तक्रारीनुसार, १५ ऑगस्ट रोजी ते कामानिमित्त गावी गेले. २९ सप्टेंबर रोजी घरी परतले. प्रवासादरम्यान मोबाइल बंद होता. घरी आल्यानंतर मोबाइल सुरू करताच बँकेतील खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे मेसेज आले. त्यांच्या बँक खात्यातून ५ लाख ६९ हजार रुपये डेबिट झाले होते.
या पैशांबाबत कोणताही व्यवहार केलेला नसल्याने अज्ञात व्यक्तीने त्यांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याची खात्री पटताच त्यांनी सायबर हेल्पलाइनवर तक्रार दिली. त्यानंतर पुन्हा कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने अखेर, मंगळवारी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. प्रवासादरम्यान त्यांनी केलेले व्यवहार तसेच अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे पैसे नेमके किती डेबिट झाले याचा शोध घेण्यात येत आहे.
Web Summary : Mumbai businessman lost ₹5.5 lakh from his account without sharing OTP or links. Police are investigating the cyber fraud after the victim lodged a complaint, revealing unauthorized debits during his travel.
Web Summary : मुंबई के एक व्यवसायी ने ओटीपी या लिंक साझा किए बिना अपने खाते से ₹5.5 लाख खो दिए। पुलिस साइबर धोखाधड़ी की जांच कर रही है। पीड़ित ने यात्रा के दौरान अनाधिकृत डेबिट का खुलासा करते हुए शिकायत दर्ज कराई।