लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सध्या नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर भामटे वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत आहेत. गॅसटंचाईच्या काळात तर घरगुती पाइप गॅस असलेल्यांना तुमचे कनेक्शन बंद होईल, असे सांगत १३ रुपये भरण्यास सांगून आर्थिक गंडा घालत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. सिम स्वॅप फसवणुकीच्या घटना वाढल्याने पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सायबर भामटे क्रेडिट कार्डवर हाय लिमिट, विनाशुल्क, आजीवन मोफत वापर ते बँक अधिकारी असल्याचे भासवून पॅनकार्ड, आधार, मोबाइल क्रमांक, जन्मतारीख ही महत्त्वाची माहिती गोळा करतात. पुढे, बनावट कागदपत्रे किंवा चोरी केलेली ओळख वापरून टेलिकॉम कंपनीकडे सिमसाठी अर्ज करतात.
यासाठी मोबाइल हरवला किंवा नवीन घेतल्याचे कारण देतात. सिम मिळाल्यावर ओटीपी व बँक/ यूपीआय कार्ड अलर्ट त्यांना मिळतात. त्याचआधारे रक्कम त्वरित व्यवहारांद्वारे काढली जाते, यासाठी म्यूल अकाउंट किंवा प्रीपेड वॉलेटचा वापर होतो. फिशिंग कॉल्स, बनावट केव्हायसी/नोकरी अर्ज, डार्क वेबवरील लीक डेटाबेस, सोशल मीडिया प्रोफाइल आणि बनावट ॲप्सद्वारे सायबर गुन्हेगार पीडितांची माहिती गोळा करतात.
‘डेटा दिला की गेम ओव्हर !’
फसवणूक करण्यासाठी भामटे बनावट कागदपत्रे वापरून नवीन सिम मिळवतात. मूळ सिम बंद झाल्यावर ओटीपी आणि संदेश फसवणूक करणाऱ्याला मिळतात. तसेच बँक, यूपीआय, ई-मेल, सोशल मीडिया खात्यांमध्येही प्रवेश मिळवून आर्थिक फसवणूक केली जाते.
असे ओढतात जाळ्यात
सुरुवातीचा संपर्क फोन कॉल, एसएमएस किंवा व्हाॅट्सॲपद्वारे होतो. अनेकदा बनावट बँक आयडी किंवा स्पूफ नंबरचा वापर केला जातो. पीडितांना ‘प्री-अप्रूव्ह’ क्रेडिट कार्ड मिळाल्याचे सांगितले जाते. तत्काळ केवायसी आवश्यक असल्याचे सांगून वैयक्तिक माहिती मागवली जाते. काही प्रकरणांत बनावट बँक पोर्टलवर लिंक क्लिक करून फॉर्म भरायला सांगितले जाते.
..तर सावध व्हा : कोणताही अर्ज न करता आलेली ऑफर असुरक्षित आहे. फोन, व्हाॅट्सॲपवर पूर्ण केवायसीची मागणी होते. रिचार्ज असूनही अचानक मोबाइल नेटवर्क बंद होते, स्वतः न केलेल्या व्यवहारांसाठी ओटीपी किंवा अलर्ट मिळतो आणि परवानगी न देता बँक खात्यातून पैसे वळतात. त्यामुळे वेळीच सावध होण्याचे आवाहन केले आहे.
तक्रार कुठे?: आपल्या बँकेच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.
येथे तक्रार नोंदवा: cybercrime.gov.in
Web Summary : Cybercriminals are using tactics like free card offers and SIM swapping to steal money from bank accounts. They gather personal data, obtain duplicate SIMs, intercept OTPs, and make unauthorized transactions. Stay vigilant and report suspicious activity to your bank and cybercrime authorities.
Web Summary : साइबर अपराधी मुफ्त कार्ड प्रस्तावों और सिम स्वैपिंग जैसी रणनीति का उपयोग करके बैंक खातों से पैसे चुरा रहे हैं। वे व्यक्तिगत डेटा एकत्र करते हैं, डुप्लिकेट सिम प्राप्त करते हैं, ओटीपी को रोकते हैं और अनधिकृत लेनदेन करते हैं। सतर्क रहें और संदिग्ध गतिविधि की सूचना अपने बैंक और साइबर अपराध अधिकारियों को दें।