तीन वर्षांच्या बालिकेचा विनयभंग
By Admin | Updated: January 31, 2016 02:13 IST2016-01-31T02:13:14+5:302016-01-31T02:13:14+5:30
तीन वर्षांच्या बालिकेचा विनयभंग करण्याची घटना गोरेगावमध्ये घडली. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी एका बारा वर्षीय मुलाला अटक केली आहे. त्याची रवानगी बालसुधारगृहात

तीन वर्षांच्या बालिकेचा विनयभंग
मुंबई : तीन वर्षांच्या बालिकेचा विनयभंग करण्याची घटना गोरेगावमध्ये घडली. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी एका बारा वर्षीय मुलाला अटक केली आहे. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
गुरुवारी तिच्या घरासमोर खेळत होती. खेळता-खेळता ती अचानक गायब झाली. त्यामुळे तिच्या आईने तिला सर्वत्र शोधण्यास सुरुवात केली. मात्र, ती कुठेच सापडली नाही. त्यानंतर याच परिसरात असलेल्या एका पाण्याच्या टाकीजवळ ही मुलगी अर्धनग्न अवस्थेत सापडली. तिच्याच शेजारी हा बारा वर्षीय मुलगा सापडला. त्यानंतर त्यास पोलीस ठाण्यात आणले. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)