रेल्वे अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

By Admin | Updated: June 12, 2016 04:38 IST2016-06-12T04:38:48+5:302016-06-12T04:38:48+5:30

रेल्वे वर्कशॉपमध्ये काम करत असलेल्या वरीष्ठ अधिकाऱ्याने तेथील महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी एन.एम.जोशी

Molestation offense against railway authorities | रेल्वे अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

रेल्वे अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

मुंबई : रेल्वे वर्कशॉपमध्ये काम करत असलेल्या वरीष्ठ अधिकाऱ्याने तेथील महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी एन.एम.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोअर परळ येथील रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये तक्रारदार महिला गेल्या वर्षभरापासून काम करते. त्याच ठिकाणी के.के जैन हे वरिष्ठ पर्यवेक्षक अभियंता पदावर आहेत. गेल्या काही दिवसापासून कामाच्या बहाण्याने अश्लील शेरेबाजी करणे, हात पकडणे असे प्रकार त्यांच्याकडून सुरु असल्याचा आरोप महिलेने केला आहे. जैन विरोधात त्यांनी वरिष्ठांकडेही तक्रार केली.तरी देखील जैनच्या वागणुकीत फरक पडला नाही. अखेरया महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Molestation offense against railway authorities