गोराईत अनेक तरुणींचा विनयभंग?
By Admin | Updated: May 16, 2015 00:01 IST2015-05-16T00:01:00+5:302015-05-16T00:01:00+5:30
गोराई पोलिसांनी एका १७वर्षीय तरुणीच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटक केली होती. या दोघांकडे सापडलेल्या काही छायाचित्रांवरून

गोराईत अनेक तरुणींचा विनयभंग?
मुंबई : गोराई पोलिसांनी एका १७वर्षीय तरुणीच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटक केली होती. या दोघांकडे सापडलेल्या काही छायाचित्रांवरून त्यांनी यापूर्वी अशा प्रकारे अनेक मुलींचा विनयभंग केल्याचा संशय पोलिसांनी असून, त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.
मालाडच्या मनोरी परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये नेऊन १७वर्षीय मुलीचे अश्लील छायाचित्रण करून तिचा विनयभंग करणाऱ्या सम्राट तांबे आणि अब्बास पत्रावाला यांना गोराई पोलिसांनी अटक केली होती. तपासात त्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली असता दोघांकडून अनेक तरुणींची छायाचित्रे हस्तगत करण्यात आली. त्यानुसार नालासोपाऱ्यात राहणाऱ्या पीडित तरुणीप्रमाणे सम्राट आणि अब्बास यांनी या मुलींसोबतही अश्लील व्यवहार केल्याची शक्यता आहे. या प्रकरणी तपास करून या मुलींचा शोध घेऊन त्यांचे जबाब नोंदविणार असल्याचे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, अटक केलेल्या दोघांनाही न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)