मोखाडा तहसीलमधील पदे रिक्तच; कामकाज ठप्प !
By Admin | Updated: December 21, 2014 23:27 IST2014-12-21T23:27:47+5:302014-12-21T23:27:47+5:30
तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय सर्वात महत्त्वाचे कार्यालय म्हणून ओळखले जाते. परंतु मोखाड्यातील तहसील कार्यालयाच्या कामकाजाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.

मोखाडा तहसीलमधील पदे रिक्तच; कामकाज ठप्प !
मोखाडा ग्रामीण : तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय सर्वात महत्त्वाचे कार्यालय म्हणून ओळखले जाते. परंतु मोखाड्यातील तहसील कार्यालयाच्या कामकाजाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. लिपिक, अव्वल कारकून अशी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने नागरिकांना किरकोळ कामासाठी महिनोन्महिने वाट पहावी लागते.
भौगोलिकदृष्ट्या २० ते ३० कि.मी.पर्यंत विखुरलेल्या खेड्यापाड्यातून आदिवासी बांधव पदरमोड करून या कार्यालयात येतो, पण काम होतच नाही. कारण साहेब नसतात. पैशाची चणचण भासणाऱ्या आदिवासींना यासाठी भुर्दंड सहन करावा लागतो. मोखाडा तालुक्यातील कार्यालयात मंजूर १२ लिपिकांपैकी केवळ ५ जागा भरलेल्या ओहत. त्यापैकी ३ लिपिकांना इतरत्र वर्ग केल्याने १२ जागांचा भार केवळ २ लिपिकांवर पडत आहे. अव्वल कारकूनांची २ पदे जरी भरलेली दिसत असली तरी ते दोघे ठाणे आणि प्रांत कार्यालयात वर्ग करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक कार्यालयात लिपिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून रिक्त जागांमुळे कामांना वेळ लागतो.
पुरवठा विभाग संजय गांधी निराधार योजना रोजगार हमी विविध दाखले यासाठी अर्ज प्राप्त करूनही ते सादर करण्यासाठी शेकडो आदिवासी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत परंत या रिक्त पदामुळे कोणतीच कामे वेळेवर होत नाही.