Join us

२ दिवसांसाठी दुबईला चाललोय, चला एकत्र पार्टी करू; कंबोज यांनी राऊतांना डिवचलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2023 18:51 IST

चला माझ्यासोबत दुबईला, एकत्र पार्टी करूया. तुम्ही येत नसाल तर तुमची डिक्टेटिव्ह एजन्सी आहे असा खोचक टोला कंबोज यांनी लगावला.

मुंबई - मी २ दिवसांच्या सुट्टीसाठी दुबईला चाललोय, तुम्हाला लोकांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची सवय आहे. कोण कुठे चाललंय, कोण कॅसिनो खेळतंय. कोण पबमध्ये आहे की डिस्कोमध्ये..तुम्हाला पार्टीचा छंद आहे. लपूनछपून तुम्ही कुठे कुठे जात असता. कधी आरेमध्ये जाता, कधी ग्रँड हयातमध्ये असा खोचक टोला मोहित कंबोज यांनी संजय राऊतांना लगावला. 

मोहित कंबोज म्हणाले की, चला माझ्यासोबत दुबईला, एकत्र पार्टी करूया. तुम्ही येत नसाल तर तुमची डिक्टेटिव्ह एजन्सी आहे.त्यांना काही फोटो, व्हिडिओ मिळाले तर देशासोबत शेअर करा. त्याचसोबत तुमच्या मानसिक आजारावर उपचार घ्या. त्याची तुम्हाला गरज आहे. Get Well Soon. घराच्या बाहेर पडा, देशाबाहेर फिरा, बाहेर फिराल तर चांगले, पण तुम्हाला ईडीची लूकआऊट नोटीस आहे. त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. हरकत नाही. आम्ही फिरून येतो. फिरून आल्यावर भेटू अशी खिल्ली राऊतांची उडवली आहे. 

काय आहे प्रकरण?भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊला गेल्यानंतर त्याठिकाणचे बावनकुळे कॅसिनो खेळतानाचे फोटो आणि व्हिडिओ राऊतांनी शेअर केले. राऊतांच्या या फोटोवरून बराच वाद रंगला. बावनकुळेंनी एका रात्रीत साडे तीन कोटी उधळले असा आरोप राऊतांनी केला. राऊतांच्या या आरोपावरून भाजपा नेत्यांनी जोरदार पलटवार केला. त्यात मोहित कंबोज यांनीही राऊतांवर आरोप करत बावनकुळेंचा बचाव केला होता. आता पुन्हा एकदा कंबोज यांनी राऊतांना डिवचलं आहे. 

टॅग्स :मोहित कंबोज भारतीयसंजय राऊत