मोहम्मद बाशीचे न्यूयॉर्कमध्ये नेतृत्व
By Admin | Updated: March 26, 2015 00:46 IST2015-03-26T00:46:01+5:302015-03-26T00:46:01+5:30
महापालिका शाळांना लो स्टॅण्डर्ड, झोपडपटटीतली मुले शिकतात तिथे, शिक्षणाचा दर्जा सुमार अशी दुषणे दिली जातात.

मोहम्मद बाशीचे न्यूयॉर्कमध्ये नेतृत्व
मुंबई : महापालिका शाळांना लो स्टॅण्डर्ड, झोपडपटटीतली मुले शिकतात तिथे, शिक्षणाचा दर्जा सुमार अशी दुषणे दिली जातात. मात्र याच शाळेत शिकणाऱ्या एका पाचवीतल्या विद्यार्थ्याने गणित विषयाच्या एका राष्ट्रीय स्पर्धेत ३५ हजार विद्यार्थ्यांमधून पहिला क्रमांक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे हा विद्यार्थी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या पुढील स्पर्धेत देशाचे प्रतिनित्व करणार आहे.
मोहम्मद अली बाशी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. घाटकोपर, पंतनगरातील महापालिकेच्या इंग्रजी शाळेत अली पाचव्या इयत्तेत शिकतो. महापौर स्नेहल आंबेकर यांनी अलीचे कौतुक करत पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रेसीम लिमिटेड संस्थेमार्फत गणित विषयावरील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात देशातील २४ शहरांमधील तब्बल ३५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. अलीने या सर्वांवर मात करत पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेचा पुढला टप्पा ३१ मे रोजी न्यूयॉर्कमध्ये रंगेल. त्यात अली भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
न्यूयॉर्कचा व्हीजा, प्रवास खर्च, न्यूयॉर्कला जाण्याची व तिथे राहण्याची सोय खाजगी संस्थेमार्फत केली जाणार आहे़ त्याच्याबरोबर पालिकेचे उप शिक्षण अधिकारी
डॉ़ जिवबा केळुस्करही जाणार
आहेत़ (प्रतिनिधी)