Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद अली रोड झाला 'फेरीवालामुक्त'; महापालिकेची अतिक्रमणाविरोधात मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:15 IST

मुंबईतला २० प्रमुख रस्त्यांचा उल्लेख करीत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशाने कारवाईला सुरुवात झाली आहे.

मुंबई

मुंबईतला २० प्रमुख रस्त्यांचा उल्लेख करीत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशाने कारवाईला सुरुवात झाली आहे. यापैकी बॉ वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या मोहम्मद अली रोड आणि लोकमान्य टिळक मार्गावर गेल्या काही दिवसांत सातत्याने कारवाई केली असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

रस्ते वाहतुकीला अडथळा आणि मोहम्मद अली रोड आणि लोकमान्य टिळक मार्गावर विशेष मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. जेसीबीद्वारे या रोडवरील अनधिकृत स्टॉल आणि टपऱ्या तोडल्या असून एकाही फेरीवाल्याला रस्त्यावर बसू दिले जात नसल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. 

अनधिकृत स्टॉल, शेड जमीनदोस्त

१. ६ ते ८ जानेवारीदरम्यान नारायण धुरी रोड, अब्दुल रहमान रोड, युसूफ मेहर अली रोड, मस्जिद बंदर आणि नरसी नाथा रोडवर कारवाई करण्यात आली. यामध्ये १५ अनधिकृत स्टॉल तोडण्यात आले. तर एकूण ४५ जणांवर कारवाई केली. 

२. ९ जानेवारीला लोकमान्य टिळक रोड, पायधुनी आणि डोंगरी भागात, तसेच डॉ. महेश्वरी रोडवर कारवाई करण्यात आली. यामध्ये २३ जणांचा माल जप्त करण्यात आला, डोंगरी परिसरातील दोन स्टॉल तोडण्यात आले. 

३. १५ जानेवारीला एसव्हीपी रोड, बाबूला टँक रोड, ए आर रोड येथे जोरदार कारवाई करण्यात आली. यामध्ये २० शेड तोडण्यात आल्या, तर ३५ जणांचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाफेरीवाले