मोदींचे रेडिओवरील भाषण ‘टीव्ही’वर
By Admin | Updated: October 4, 2014 02:39 IST2014-10-04T02:39:48+5:302014-10-04T02:39:48+5:30
संपूर्ण टेक्नॉलॉजी एका तळहातावर सामावल्यामुळे दस:याच्या मुहूर्तावर पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे ज्येष्ठ नागरिकांनी मात्र पाठ फिरवली.
मोदींचे रेडिओवरील भाषण ‘टीव्ही’वर
>मुंबई : संपूर्ण टेक्नॉलॉजी एका तळहातावर सामावल्यामुळे दस:याच्या मुहूर्तावर पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे ज्येष्ठ नागरिकांनी मात्र पाठ फिरवली. याच रेडिओवरच्या भाषणाबद्दल ज्येष्ठ नागरिकांना माहिती मिळाली ती टीव्हीवरून. त्यामुळे मोदींची ‘मन की बात’ ज्येष्ठांर्पयत आणि शहरी भागातील नागरिकांर्पयत पोहोचू शकली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयादशमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी देशातील नागरिकांना संबोधित केले. या वेळी पंतप्रधान मोदींनी युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी रेडिओवरून दर रविवारी भेटण्याचा निर्धार केला. मात्र ठरावीक मतदार वर्गाला ‘टार्गेट’ करण्यास निघालेल्या मोदींना ज्येष्ठ नागरिकांचा विसर पडला आहे. शहर - उपनगरांतील रेडिओचा जमाना गेल्यामुळे शुक्रवारी ज्येष्ठ नागरिक या भाषणाला मुकले. त्यामुळे मोदींच्या या उपक्रमाबद्दल ज्येष्ठ नागरिकांमध्ये काहीशी निराशाच दिसून आली.
पूर्वी शहर-उपनगरातील चाळींमध्ये ‘रेडिओ संस्कृती’ टिकून होती. आता मात्र कॉम्प्युटर्स आणि स्मार्टफोन्सच्या क्रांतीमुळे ती काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यामुळेच ज्यांना मोदींच्या रेडिओवरील भाषणाचा आस्वाद घ्यायचा होता, अशा ज्येष्ठ नागरिकांना तो टीव्हीवरून घ्यावा लागला. या भाषणातही पंतप्रधान मोदी यांनी स्त्री, युवक आणि शेतकरी यांच्यातील शक्तीला ‘त्रिशुळाची शक्ती’ असे संबोधले. शिवाय या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी ज्येष्ठ नागरिकांचा उल्लेखही केला नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी आहे. मात्र मोदींच्या या प्रयत्नातून पुन्हा एकदा सर्वार्पयत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्नच दिसून येतो. (प्रतिनिधी)
आघाडी सरकारने ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना केली, मात्र आता पंतप्रधान मोदींकडून आम्हाला अपेक्षा होती. परंतु त्यांनी या उपक्रमातून निराशा पदरी पाडली.
- विनायक नेवरे, ज्येष्ठ नागरिक
पंतप्रधान मोदींनी ज्येष्ठ नागरिकांचाही विचार केला पाहिजे. देशभरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आह़े त्यामुळे त्यांच्या समस्यांचा, प्रलंबित मागण्यांचा विचार करणो गरजेचे आहे.
- कांचन शेवडे, ज्येष्ठ नागरिक