लसीकरणाची सुरूवात मोदींनी स्वतःपासून करावी - नवाब मलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST2021-01-13T04:12:26+5:302021-01-13T04:12:26+5:30

लसीकरणाची सुरुवात मोदींनी स्वतःपासून करावी नवाब मलिक : इतक्या गंभीर विषयात तरी राजकारण करू नका, भाजपचा पलटवार लोकमत न्यूज ...

Modi should start vaccination on his own - Nawab Malik | लसीकरणाची सुरूवात मोदींनी स्वतःपासून करावी - नवाब मलिक

लसीकरणाची सुरूवात मोदींनी स्वतःपासून करावी - नवाब मलिक

लसीकरणाची सुरुवात मोदींनी स्वतःपासून करावी

नवाब मलिक : इतक्या गंभीर विषयात तरी राजकारण करू नका, भाजपचा पलटवार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एकीकडे कोरोना लसीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यास सुरुवात केली असतानाच लसीवरून राजकारणालाही सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. तर, किमान अशा विषयात तरी राजकारण करू नका, असे प्रतिउत्तर भाजपने मलिक यांना दिले.

दिनांक १६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सैन्यदलातील व्यक्तिंना लसीकरण केले जाणार आहे. परंतु, या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका आहे. त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेतली तर जनतेच्या मनातील भीती निघून जाईल, असेही नवाब मलिक म्हणाले. यावर मलिक यांचे विधान हे राष्ट्रवादीच्या राजकीय संस्कृतीला धरून असल्याचा पलटवार भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. आजवर सर्व काही प्रथम आपल्यालाच, अशी व्हीआयपी संस्कृती देशाने अनुभवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात यात बदल झाला. सामान्य नागरिक आणि आरोग्य कर्मचारी, कोविड योद्ध्यांना प्राधान्य देण्यात येत असताना लसीकरणावरून असे राजकारण करणे अनुचित आहे. आपल्याच घरात लोकसभा, राज्यसभा, आमदारकीपासून नगरसेवक अशी सत्ता पदे ठेवण्याची राष्ट्रवादीची संस्कृती आहे. यालाच अनुसरून नवाब मलिकांनी लसीकरणाबाबत विधाने केली आहेत. इतक्या गंभीर विषयात तरी राजकारण टाळायला हवे, असे उपाध्ये म्हणाले.

.....................

Web Title: Modi should start vaccination on his own - Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.