Join us

मोदी सरकारने दोन गव्हर्नरांना पद सोडण्यास भाग पाडले- पी. चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 04:44 IST

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दोन - दोन गर्व्हनरांना अपमानित करून आपले पद सोडण्यास भाग पाडले, असा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी येथे केला.

मुंबई : सध्याच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दोन - दोन गर्व्हनरांना अपमानित करून आपले पद सोडण्यास भाग पाडले, असा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी येथे केला.वांद्रे येथे अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेसने ‘भारतीय अर्थव्यवस्था : संधी आणि आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यात चिदंबरम बोलत होते. यावेळी चिदंबरम यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि ऊर्जित पटेल यांची थेट नावे घेतली नाहीत परंतु त्यांचा भाषणाचा रोख या दोन नावांकडेच होता.अलिकडेच ऊर्जित पटेल यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच गव्हर्नरपदाचा त्याग केला होता तर रघुराम राजन यांनी सरकारने या पदावर मुदतवाढ न दिल्याने गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता.