आत्महत्येप्रकरणी मॉडेलच्या मित्रला अटक
By Admin | Updated: October 3, 2014 02:32 IST2014-10-03T02:32:41+5:302014-10-03T02:32:41+5:30
मॉडेल अर्चना पांडे हिच्या आत्महत्येप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी तिचा मित्र आसिफ पठाण याला अटक केली आहे.

आत्महत्येप्रकरणी मॉडेलच्या मित्रला अटक
>मुंबई : मॉडेल अर्चना पांडे हिच्या आत्महत्येप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी तिचा मित्र आसिफ पठाण याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 6 तारखेर्पयत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वर्सोवा येथील म्हाडा कॉलनीत राहणा:या अर्चना पांडे (26) या मॉडेलने राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. सोमवारी 29 सप्टेंबरला तिच्या घरातून दरुगधी येत असल्याची तक्रार शेजा:यांनी पोलिसांना दिली. वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फ्लॅटचे दार तोडून आत प्रवेश केल्यावर अर्चनाचा कुजलेला मृतदेह पंख्याला गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली, त्यात गेल्या काही महिन्यांपासून ती नैराश्याने ग्रासली होती, तसेच तिची आर्थिक परिस्थिती खराब झाल्याचे तिने नमूद केले होते. याकरिता तिने आपल्या मित्रच कारणीभूत असल्याचे लिहिले होते. तिच्या आई-वडिलांचे निधन झाले असून, गुजरात पोलिसांनी तिच्या भावाला आर्थिक गुन्ह्याप्रकरणी अटक केली होती.अर्चना मिङर प्रॉडक्शन या कंपनीत आर्थिक सल्लागार म्हणून काम करीत होती. तिने एका कॅलेंडरकरिता मॉडेलिंग केले होते. तसेच काही दक्षिणोच्या अल्बममध्येही काम केले होते. (प्रतिनिधी)