बलात्कारप्रकरणी मॉडेलही दोषी - आझमी
By Admin | Updated: July 27, 2014 00:54 IST2014-07-27T00:54:42+5:302014-07-27T00:54:42+5:30
उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांनी अधिकाराचा गैरफायदा घेत मॉडेलवर बलात्कार केल्याच्या घटनेमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन झाली

बलात्कारप्रकरणी मॉडेलही दोषी - आझमी
मुंबई : उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांनी अधिकाराचा गैरफायदा घेत मॉडेलवर बलात्कार केल्याच्या घटनेमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन झाली असताना समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी यांनी मात्र त्यांची बाजू उचलून धरली आहे. मॉडेलने सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्याने तीही या प्रकरणामध्ये दोषी असून, तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पारसकर हे पश्चिम प्रादेशिक विभागामध्ये अप्पर आयुक्त
असताना दीड वर्षापासून एका सी ग्रेड मॉडेलच्या संपर्कात होते. तिच्याशी मढ येथील बंगल्यावर नेऊन शारीरिक संबंध ठेवले होते. या प्रकरणी संबंधित तरुणीने पारसकर यांच्याशी मतभेद झाल्याने बलात्काराची तक्रार दिली आहे.
त्यांच्याशी असलेल्या संबंधाबाबतची क्लिप, ई-मेल व मेसेजही पोलिसांना पुराव्यादाखल दिले आहेत. वरिष्ठ अधिका:यांबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत असताना अबू आझमी यांनी मात्र पहिलाच सूर आवळला आहे. इस्लामनुसार परपुरुषाशी संबंध ठेवणा:या महिलेला दोषी मानले जाते, असे आझमी म्हणतात. (प्रतिनिधी)