ठाणे जिल्ह्यात मोदीलाट

By Admin | Updated: October 20, 2014 03:27 IST2014-10-20T03:27:00+5:302014-10-20T03:27:00+5:30

जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा बेलापूर मतदारसंघात अत्यंत धक्कादायक असा पराभव भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी केला.

Modalata in Thane district | ठाणे जिल्ह्यात मोदीलाट

ठाणे जिल्ह्यात मोदीलाट

नंदकुमार टेणी, ठाणे
अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा कौल स्पष्ट झाला असून मतदारांनी ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी ७ जागा भाजपाला, ६ सेनेला, ४ राष्ट्रवादीला व १ अपक्षाला देऊन काँग्रेस, मनसे आणि सपा या तीनही पक्षांना जिल्ह्यातून हद्दपार केले . काँग्रेसचा एकही आमदार जिल्ह्या नसावी ही पहिलीच वेळ तर मनसेचे डिपॉझिट जप्त झाले.
जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा बेलापूर मतदारसंघात अत्यंत धक्कादायक असा पराभव भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी केला. शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांचा पराभव असाच शॉकिंग ठरला. भार्इंदरमध्ये मेंडोन्सा तर कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे रमेश पाटील आणि कल्याण पश्चिममध्ये मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांचा पराभवही अनपेक्षित असा ठरला.
जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत ठाणे शहर संजय केळकर, डोंबिवली रवींद्र चव्हाण, कल्याण (प.) नरेंद्र पवार, भिवंडी (प.) महेश चौगुले, मुरबाड किसन कथोरे, बेलापूर मंदा म्हात्रे, मीरा-भार्इंदर नरेंद्र मेहता असे भाजपाचे ७ उमेदवार विजयी झाले आहेत. ओवळा-माजिवडा प्रताप सरनाईक, कोपरी- पाचपाखाडी एकनाथ शिंदे, कल्याण (ग्रा.) सुभाष भोईर, भिवंडी (पू.) रूपेश म्हात्रे, भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे, अंबरनाथ बालाजी किणीकर असे शिवसेनेचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड, शहापूर पांडुरंग बरोरा, उल्हासनगर ज्योती कलानी, ऐरोली संदीप नाईक असे राष्ट्रवादीचे ४ तर कल्याण (पूर्व) मध्ये गणपत गायकवाड अपक्ष विजयी झाले आहेत.

Web Title: Modalata in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.