Mobile thieves thrive in Best Bus on Kurla-Andheri and LBS | कुर्ला-अंधेरी आणि एलबीएसवरील बेस्ट बसमध्ये मोबाइल चोरांचा सुळसुळाट

कुर्ला-अंधेरी आणि एलबीएसवरील बेस्ट बसमध्ये मोबाइल चोरांचा सुळसुळाट

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाने कंबरडे मोडले असतानाच चोरांनी नाकीनऊ आणले आहेत. विशेषत: कुर्ला ते अंधेरी मार्गावर कुर्ला डेपोपासून साकीनाक्यासह अंधेरीपर्यंत आणि लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपोपासून फिनिक्स मॉलपर्यंतच्या बेस्ट बसमध्ये चोरांनी उच्छाद मांडला आहे.


विशेषत: मोबाइल चोरांचा येथील मार्गावरील बेस्ट बसमध्ये सुळसुळाट असून, गेल्या काही दिवसांत कित्येक प्रवाशांचे मोबाइल चोरीस गेले आहेत. कारण यात एक प्रकरण असे आहे की, एकाच प्रवाशाचा दोन वेळेस मोबाइल चोरीला गेला आहे. सर्वत्र मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आले.
आता लॉकडाऊन शिथिल होत असून, बेस्ट बस वेगाने धावू लागली आहे. मुळात लोकलमध्ये अद्यापही सर्वसाधारण प्रवाशांना प्रवेश नाही. त्यामुळे प्रवाशांचा भार बेस्ट बसवर पडत आहे. परिणामी साहजिकच बेस्टमध्ये गर्दी होत आहे. मुळात कुर्ला-अंधेरी रोडवर धावणाऱ्या बेस्टमध्ये चोरांचा कायमच सुळसुळाट असतो. मात्र आता कोरोनामुळे यात आणखी भर पडली आहे. सकाळच्या आणि रात्रीच्या बेस्ट बसमधील गर्दीचा चोर गैरफायदा घेत आहेत. कुर्ला-अंधेरी रस्ता आणि लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपोपासून कमानी आणि साकीनाक्यापर्यंतच्या मार्गावर बेस्ट बसमध्ये मोठ्या प्रमाणावर चोºया होत आहेत.


सकाळी किंवा सायंकाळच्या विशेषत: रात्रीच्या वेळेला हे चोर बेस्ट बसच्या मागील दाराला होत असलेल्या गर्दीमध्ये शिरतात. आणि शिताफीने प्रवाशांचा खिसा साफ करतात. यात मोबाइलचाही समावेश असतो. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला डेपो, कमानी आणि साकीनाका परिसरातील गर्दुल्लेच या चोºया करत असून, चोरी करतेवेळी एक तर हे नशेत असतात आणि त्यांच्याकडे ब्लेडसारखे तत्सम साहित्य असते. या साहित्याने चोर प्रवाशांना इजाही करतात. त्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले असून, पंधरा दिवसांच्या कालावधीत जर दोन मोबाइल चोरीला गेले तर करायचे काय? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.


‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका पोलीस ठाण्यात राहुल धुरी यांनी मोबाइल हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.या चारही तक्रारींची प्रत ‘लोकमत’कडे असून, याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


मोबाइल हरवले नाहीत
च्सहार पोलीस ठाण्यात हरेश वाघरे यांनीही मोबाइल हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यातही एकत्र तक्रार दाखल आहे. मुळात हे मोबाइल हरविले नाहीत तर चोरीला गेले आहेत. आणखी एक तक्रार साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल झाली़

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mobile thieves thrive in Best Bus on Kurla-Andheri and LBS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.