सायन परिसरात मोबाइल चोरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:08 IST2021-09-21T04:08:07+5:302021-09-21T04:08:07+5:30

मुंबई सायन परिसरात मागील काही दिवसांपासून मोबाइल चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. सायन येथील सर्व बस स्थानकांवर ही चोरांची ...

Mobile thieves in Sion area | सायन परिसरात मोबाइल चोरांचा धुमाकूळ

सायन परिसरात मोबाइल चोरांचा धुमाकूळ

मुंबई

सायन परिसरात मागील काही दिवसांपासून मोबाइल चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. सायन येथील सर्व बस स्थानकांवर ही चोरांची टोळी बसमध्ये प्रवास करणाऱ्यांचे मोबाइल चोरत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सायन येथील हायवे अपार्टमेंट ते सायन सर्कल दरम्यान असणाऱ्या बस स्थानकांवर ही चोरांची टोळी बस प्रवासाचे नाटक करत उभी असते. यावेळी बसमध्ये चढताना तसेच बसमधील गर्दीचा फायदा घेत हे चोर प्रवाशांचे मोबाइल चोरत आहेत. या परिसरात दिवसाला अशा वीस ते तीस घटना घडत असल्याचे येथील व्यापारी सांगत आहेत. शनिवारी सायंकाळी दोन तासात चार जणांचे मोबाइल चोरांनी लंपास केले. याप्रकरणी विशाल सिंग, अमित गायकवाड, रवींद्र होनराव या फिर्यादींनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बसमधील गर्दीचा फायदा घेत ही टोळी अत्यंत महागडे मोबाइल लंपास करत असल्याने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन या फिर्यादींनी केले आहे.

Web Title: Mobile thieves in Sion area