पनवेलमध्ये मोबाइल चोराला अटक
By Admin | Updated: April 10, 2015 22:38 IST2015-04-10T22:38:57+5:302015-04-10T22:38:57+5:30
एस.टी. स्टँड येथे बसमध्ये चढत असताना मोबाइल चोरीच्या प्रयत्नाची घटना घडली आहे. निखील पाटील हे पनवेल एस.टी. स्टँड येथे अलिबाग बसमध्ये चढत

पनवेलमध्ये मोबाइल चोराला अटक
पनवेल : एस.टी. स्टँड येथे बसमध्ये चढत असताना मोबाइल चोरीच्या प्रयत्नाची घटना घडली आहे. निखील पाटील हे पनवेल एस.टी. स्टँड येथे अलिबाग बसमध्ये चढत असताना अब्दुल्ला खान या चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पाटील यांनी आरडाओरडा केल्यामुळे काही लोकांनी चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)