सराईत मोबाइल चोराला मालाडमध्ये अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:09 IST2020-12-05T04:09:07+5:302020-12-05T04:09:07+5:30
नऊ गुन्ह्यांची उकल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सराईत मोबाइल चोराला कुरार पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्यावर मुंबईतील अनेक ...

सराईत मोबाइल चोराला मालाडमध्ये अटक
नऊ गुन्ह्यांची उकल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सराईत मोबाइल चोराला कुरार पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्यावर मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असून, नऊ मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
नौशाद इस्माईल खान (२०) असे अटक केलेल्या चोराचे नाव असून, तो मालाडच्या अप्पापाडा परिसरात एसआरए इमारतीत राहतो. वडाळा ट्रक टर्मिनल्स पोलीस ठाण्याकडून तडीपार असलेल्या खानवर कुरारसह व्ही. बी. रोड पोलीस ठाण्यात चोरी तसेच घरफोडीसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस उपनिरीक्षक सातार्डेकर व गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्याला अटक करून त्याची चौकशी केली असता त्याने नऊ मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
...................................