’तो’ मोबाईल क्रमांक रवी पुजारीचाच

By Admin | Updated: October 25, 2016 04:27 IST2016-10-25T04:27:27+5:302016-10-25T04:27:27+5:30

विलेपार्लेच्या गझाली हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात तक्रारदार यांना दिलेल्या व्हिजिटिंग कार्डमधील मोबाइल क्रमांकाची ओळख पटली आहे. तो क्रमांक कुख्यात

The mobile number Ravi Pujaari said | ’तो’ मोबाईल क्रमांक रवी पुजारीचाच

’तो’ मोबाईल क्रमांक रवी पुजारीचाच

मुंबई : विलेपार्लेच्या गझाली हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात तक्रारदार यांना दिलेल्या व्हिजिटिंग कार्डमधील मोबाइल क्रमांकाची ओळख पटली आहे. तो क्रमांक कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीचाच असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार विलेपार्ले पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
शुक्रवारी रात्री गझाली हॉटेलमध्ये गोळीबार करण्यात आला. गोळीबारापूर्वी या हॉटेलचा वेटर मनोहर चौगुले याला त्यांनी एक कार्ड दिले होते. त्यावर असलेल्या मोबाइल क्रमांकावर फोन करण्याची धमकी नोकरामार्फत मालकाला देण्यात आली.
त्यानुसार विलेपार्ले पोलिसांनी कार्डवरील क्रमांकाची अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली. या क्रमांकाच्या चौकशीत तो फोन रवी पुजारी नावानेच नोंदला असल्याचे उघड झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या मोबाइल क्रमांकाचे लोकेशन तसेच त्यावरून अन्य कोणाला फोन करण्यात आले होते का, हे पोलीस पडताळून पाहत आहेत. मात्र अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून नोकर, मालक आणि संबंधितांचे जबाब पोलीस नोंदवत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The mobile number Ravi Pujaari said