स्पेअर पार्ट बदलण्याच्या नावाखाली मोबाइल, रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:06 IST2020-12-08T04:06:09+5:302020-12-08T04:06:09+5:30
मालाड पाेलिसांकडून बापलेकास अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महामार्गावर बिघडलेल्या गाडीचे स्पेअर पार्ट बद्दलण्याच्या नावाखाली महिला चालकाची फसवणूक ...

स्पेअर पार्ट बदलण्याच्या नावाखाली मोबाइल, रोकड लंपास
मालाड पाेलिसांकडून बापलेकास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महामार्गावर बिघडलेल्या गाडीचे स्पेअर पार्ट बद्दलण्याच्या नावाखाली महिला चालकाची फसवणूक करत रोख रक्कम आणि मोबाइल लंपास करणाऱ्या बापलेकाला रविवारी मालाड पाेलिसांनी अटक केली.
बाप आसिफ शेख आणि मुलगा फैजल शेख अशी अटक आराेपींची नावे असून ते नालासोपारा येथे राहणारे आहेत. त्यांच्यावर मालाड, पवई, बांगुरनगर, कुरार, मालवणी, विरारमध्ये गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावर एखादी गाडी अडवून त्याच्या बोनेटमधून धूर येत असल्याचे ते चालकाला सांगायचे. त्यानंतर आसिफ आपण मॅकेनिक असल्याचे सांगून चालकाकडून पैसे उकळायचा, तर फैजल संधीचा फायदा घेऊन चालकाचे सामान अथवा मोबाइल घेऊन पसार व्हायचा. असाच प्रकार त्यांनी मनस्वी सूर्यकांत (२९) यांच्यासोबत केला. त्यांचे ८ हजार रुपये आणि मोबाइल घेऊन पळ काढला. त्यांनी मालाड पोलिसांत तक्रार करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉर्ज फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर मुजावर, उपनिरीक्षक प्रवीण तुपारे यांच्या पथकाने सीसीटीव्ही तसेच अन्य तांत्रिक तपास करून पुन्हा अशाच प्रकारे फसवणूक करण्यासाठी आलेल्या बापलेकाला सापळा रचून अटक केली.