मोबाइल करता येणार ‘लॉक’

By Admin | Updated: January 21, 2015 02:08 IST2015-01-21T02:08:17+5:302015-01-21T02:08:17+5:30

रेल्वे प्रवासात मोबाइल चोरीला गेल्यानंतर चोरांकडून त्याचा गैरवापर केला जातो. हा गैरवापर थांबविण्यासाठी मोबाइलच लॉक करता यावा यासाठी रेल्वे पोलिसांचा (जीआरपी) प्रयत्न सुरू आहे.

Mobile can 'lock' | मोबाइल करता येणार ‘लॉक’

मोबाइल करता येणार ‘लॉक’

मुंबई : रेल्वे प्रवासात मोबाइल चोरीला गेल्यानंतर चोरांकडून त्याचा गैरवापर केला जातो. हा गैरवापर थांबविण्यासाठी मोबाइलच लॉक करता यावा यासाठी रेल्वे पोलिसांचा (जीआरपी) प्रयत्न सुरू आहे. यासाठी रेल्वे पोलिसांची मोबाइल कंपन्यांशी बोलणी सुरू असून, एक नवीन अ‍ॅप तयार करण्यात यावे, अशी मागणीच केल्याचे रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितले.
रेल्वेतून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे मोबाइल चोरीला जातात. मोबाइल चोरीला गेल्यानंतर या मोबाइलचा शोध लावण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून प्रथम तक्रारदाराकडून मोबाइलमध्ये असलेला आयएमईआय नंबर मागितला जातो. या नंबरवरून मोबाइलचा शोध लावला जातो. मोबाइल विकत घेताना असलेल्या कागदपत्रांमध्येही हा नंबर नमूद केलेला असतो.
मात्र बहुतांश लोकांकडून कागदपत्रच गहाळ होतात आणि मोबाइल चोरीला गेल्यानंतर या कागदपत्रांची आठवण येते. त्यामुळे मोबाइल चोराला पकडणे रेल्वे पोलिसांना कठीण जाते आणि चोर मोबाइलचा सररासपणे दुसरे सिमकार्ड टाकून गैरवापर करतात. या मोबाइल चोरीची प्रवाशांबरोबरच रेल्वे पोलिसांनाही मोठी डोकेदुखी ठरत असून, त्याचा छडा लावण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. २0१३मध्ये १ हचार ४५ मोबाइल चोरीच्या घटना घडल्या; आणि यातील ७१0 चोऱ्यांचा उलगडा झाला. २0१४मध्ये मोबाइल चोरीच्या घटनांत वाढ झाली असून, तब्बल १ हजार ५१८ मोबाइल चोरीला गेले; तर ८६३ मोबाइल चोऱ्यांचा छडा लावण्यात रेल्वे पोलिसांना यश आल्याचे जीआरपी आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सांगितले. मोबाइल चोऱ्यांमुळे होणारा मनस्ताप टाळण्यासाठी मोबाइलच लॉक केला जाऊ शकतो का याची चाचपणी सुरू आहे. यासाठी मोबाइल कंपन्यांशीही बोलणी सुरू असून, त्यासाठी नवीन अ‍ॅप विकसित केले जाऊ शकते का यावर चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. अ‍ॅप विकसित केल्यास कंपन्यांकडून आणि रेल्वे पोलिसांकडून मोबाइलच सहजपणे लॉक केला जाऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

2014
मध्ये मध्य रेल्वेमार्गावरील सीएसटी विभागात ४५५, कल्याण विभागात ४00,
हार्बर विभागात २१४, पश्चिम रेल्वेवरील वांद्रा विभागात
२३१ आणि वसई विभागात २१८ मोबाइल चोरीला गेले आहेत.
2013
२0१३मध्ये मध्य रेल्वेमार्गावरील सीएसटी विभागात ३५४, कल्याण विभागात २११, हार्बर विभागात १५२ आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रा विभागात १६९, वसई विभागात १५९ मोबाइल चोरीला गेले आहेत.

Web Title: Mobile can 'lock'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.