नवी मुंबईतील मनसेत फूट
By Admin | Updated: September 28, 2014 00:56 IST2014-09-28T00:56:22+5:302014-09-28T00:56:22+5:30
बेलापूर मतदार संघाच्या मनसेच्या उमेदवाराविरोधातच मनसे पदाधिका:यांनी पदांचे राजीनामे दिले.

नवी मुंबईतील मनसेत फूट
>नवी मुंबई : बेलापूर मतदार संघाच्या मनसेच्या उमेदवाराविरोधातच मनसे पदाधिका:यांनी पदांचे राजीनामे दिले. इतर इच्छुकांना विश्वासात न घेता पक्षाने उमेदवार निवडल्याचे प्रमुख पदाधिका:यांनी राजीनामा देत नाराजी व्यक्त केली. बेलापूर मतदार संघातुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार गजानन काळे यांनी शनिवारी आपला अर्ज भरला. त्यामुळे नाराज मनसेच्या पदाधिका:यांनी राजीनामे दिले. वाशी येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये त्यांनी काळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. विधानसभा निवडणुकीकरीता इच्छुकांकडे विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर मात्र कोणालाही विश्वासात न घेता थेट काळे यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप मनसेचे माजी शहर अध्यक्ष जितेंद्र कांबळी यांनी केला.
पत्रकार परिषदेमध्ये गजानन काळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात पक्ष वरिष्ठांकडे यापुर्वीच तक्रारी करुन पुरावेही देण्यात आले होते. यासंदर्भात त्यांच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा ठेवुन इतके वर्ष पक्षात आपण कार्यरत होतो. मात्र कारवाई ऐवजी काळे यांनाच शहर अध्यक्ष पदावर निवडून उमेदवारीही दिली जाते.(प्रतिनिधी)
च्आपल्याला मिळालेली उमेदवारी
हा पक्षाचा निर्णय आहे. त्याप्रमाणो आपण निवडणुकीच्या कामाला लागलेलो आहे. प्रचारावर लक्ष देणार आहोत. राजीनामा दिलेल्या पदाधिका:यांवर भाष्य करण्यास टाळले. परंतू राजीनामापत्रत उल्लेख असलेल्या काही पदाधिकारी बोगस असल्याचेही त्यांनी सांगितले.
च्पक्षात सुरु असलेल्या या सर्व गैर प्रकार मान्य नसल्याचे सांगत मनविसेच्या सर्व पदाधिकारयांसह इतरही सुमारे दिडशे पदाधिकारी सामुहिक राजीनामा दिले. यावेळी कृष्णा पाटील, शिरीष पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.