कुडूस परिसरात मनसेचा खळ्ळखट्याकचा इशारा
By Admin | Updated: March 30, 2015 23:44 IST2015-03-30T23:44:57+5:302015-03-30T23:44:57+5:30
वाडा भिवंडी महामार्गालगत असलेल्या काही कंपन्यातून माल उचलणारी व कच्च माल घेवून येणारी वाहने महामार्गाच्या दुतर्फा उभी केली जात

कुडूस परिसरात मनसेचा खळ्ळखट्याकचा इशारा
कुडूस : वाडा भिवंडी महामार्गालगत असलेल्या काही कंपन्यातून माल उचलणारी व कच्च माल घेवून येणारी वाहने महामार्गाच्या दुतर्फा उभी केली जात असल्याने अनेक अपघात होतात. सदर वाहने हटवावी या मागणीसाठी मनसेने काचाफोडो आंदोलनाचा कंपन्यांना इशारा दिला आहे.
कुडूस परिसरातील वाडा भिवंडी महामार्गालगत ओनिडा, कोकाकोला, जिप्सम, चारमिनार, मोनाटोना या मोठ्या कंपन्या असून या कंपन्यात येणारी मोठी वाहने महामार्गावर दुतर्फा उभी केली जातात. यामुळे मोठी वाहतूककोंडी होते. परिणामी छोटे मोठे अपघात होतात सदर कंपन्यांनी आपली वाहने कंपनी आवारात उभी करण्याची सुविधा करावी. त्यामुळे महामार्ग मोकळा राहील व वाहनांना विना अडथळा जाता येईल जर सदर वाहने या कंपन्यांनी आठ दिवसात रस्त्यावरून हटविली नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुका शाखेच्या वतीने काचाफोडो आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील यांनी दिला आहे. याबाबत कंपन्यांनी दखल न घेतल्यास पोलीसांनी कारवाई करावी असे आवाहन पाटील यांनी केले आहे. दोन्ही कडून दखल न घेतल्यास जनतेच्या सहकार्याने काचाफोडो आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. (वार्ताहर)