Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा वीज कंपन्यांना शॉक; अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ‘बेसिक’ ४० टक्क्यांनी वाढवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 11:20 IST

‘मनसे’ने चारही वीज कंपन्यांतील सर्व कर्मचारी, अधिकारी व अभियंते यांच्या मूळ वेतनात ४० टक्के वाढ मागितली आहे.

मुंबई : शासन नियंत्रित असलेल्या सूत्रधारी कंपनी, महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या चारही वीज कंपन्यांतील सर्व कर्मचारी, अधिकारी व अभियंते यांच्याकरिता १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२८ या कालावधीकरिता देय असलेला नवीन वेतनवाढ प्रस्ताव तयार करून ‘मनसे’ने ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तसेच चारही वीज कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना सादर केला आहे. ‘मनसे’ने चारही वीज कंपन्यांतील सर्व कर्मचारी, अधिकारी व अभियंते यांच्या मूळ वेतनात ४० टक्के वाढ मागितली आहे.

सर्व सहायक प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे वेतन दुप्पट करावे, या मागणीसह वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेले संपूर्ण दैनंदिन कामकाज हे प्रामुख्याने मराठी भाषेतून व्हायला पाहिजे.

वीज कर्मचाऱ्यांवर कोणतेही आर्थिक भार देऊ नये तर १० लाखाची मूळ विमा योजना, २० लाखांची गट मुदत विमा योजना यात सुधारणा करून ती योजना ५० लाख इतकी करावी.तसेच त्या योजनेत रायडर प्लॅनचासुद्धा पर्याय निवडावा. याचबरोबर गट मुदत जीवनविमा योजना देणे, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना विना अट तत्काळ नोकरीत सामावून घेणे  अशा मागण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस संतोष विश्वेकर यांनी दिली.

मुंबई : महाराष्ट्रवासीयांचे जीवन सुसह्य झाले पाहिजे. महाराष्ट्राला सुरळीत व अखंडित वीजपुरवठा झाला पाहिजे, यासाठी महापारेषणच्या विविध प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून ती प्रगतिपथावर आहेत. महापारेषणच्या अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, अशा शब्दात महापारेषणचे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार यांनी अभियंत्यांचा गौरव केला.

भविष्यातही अखंडित व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चांगली व सातत्यपूर्ण कामगिरी करा, असा सल्लाही दिला.

सुरळीत व अखंडित वीजपुरवठा झाला पाहिजे

   भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अभियंता दिनाचे औचित्य साधून महापारेषणच्या ईआरपी-आयटी विभागाने संचलन व सुव्यवस्था विभागाकरता तयार केलेल्या एसओआर (शेड्युल ऑफ रेट), महापारेषणचे अद्ययावत संकेतस्थळ तसेच अधिकारी वर्गाकरिता ड्रोन वापराबाबत डॅशबोर्डचे अनावरण महापारेषणचे संजीव कुमार यांच्या हस्ते झाले.

   या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी महापारेषणचे संचालक संदीप कलंत्री, नसीर कादरी, अशोक फळणीकर, सुगत गमरे, कार्यकारी संचालक रोहिदास मस्के, मुख्य महाव्यवस्थापक संतोष आंबेरकर, मुख्य महाव्यवस्थापक कैलास कणसे, मुख्य महाव्यवस्थापक सुधीर वानखेडे, मुख्य महाव्यवस्थापक नागसेन वानखेडे, मुख्य अभियंता पीयूष शर्मा, भूषण बल्लाळ उपस्थित होते.