मनसे नगरसेविकेचे पद कायम

By Admin | Updated: February 13, 2015 04:51 IST2015-02-13T04:51:57+5:302015-02-13T04:51:57+5:30

जातीचे बोगस प्रमाणपत्राप्रकरणी अडचणीत आलेल्या मनसेच्या नगरसेविका प्रियंका शृगांरे यांना अखेर दिलासा मिळाला आहे़

MNS retains the rank of corporation | मनसे नगरसेविकेचे पद कायम

मनसे नगरसेविकेचे पद कायम

मुंबई : जातीचे बोगस प्रमाणपत्राप्रकरणी अडचणीत आलेल्या मनसेच्या नगरसेविका प्रियंका शृगांरे यांना अखेर दिलासा मिळाला आहे़ उच्च न्यायालयाने त्यांचे पद कायम ठेवल्यामुळे पालिकेच्या सभागृहात अखेर त्यांना बसण्याची परवानगी आज मिळाली़
पालिकेच्या वॉर्ड़ क्ऱ ११२ मधून मनसेच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या शृंगारे यांनी सादर केलेले जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार आल्यामुळे त्यांचे पद धोक्यात आले होते़ हे प्रकरण न्यायालयात गेले होते़ मात्र न्यायालयाने त्यांचे पद अबाधित ठेवण्यात आल्यामुळे शृंगारे यांना दिलासा मिळाला आहे़ याबाबत पालिकेच्या महासभेत महापौर स्नेहल आंबेकर यांनी आज घोषणा केली़त्यामुळे मनसे नगरसेवकांची संख्या कायम राहिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: MNS retains the rank of corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.