गोरेगावात मनसेचे शक्तिप्रदर्शन

By Admin | Updated: December 21, 2015 02:01 IST2015-12-21T02:01:25+5:302015-12-21T02:01:25+5:30

आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. गोरेगाव येथील पाच शाखांचे रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले

MNS power demonstration in Goregaon | गोरेगावात मनसेचे शक्तिप्रदर्शन

गोरेगावात मनसेचे शक्तिप्रदर्शन

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. गोरेगाव येथील पाच शाखांचे रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शनही केले.
गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयाजवळील मनसेचे मध्यवर्ती कार्यालय तसेच वॉर्ड क्रमांक ४६, ४९, ५१ आणि ५२ येथील शाखांचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. २४ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान, मनसेच्या वतीने मालवणी जत्रोत्सव भरविण्यात येणार आहे. या जत्रोत्सवात नाशिक महापालिकेत मनसेने केलेल्या विकास कामांचेही प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

Web Title: MNS power demonstration in Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.