Join us  

MNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 9:25 AM

MNS MahaAdhiveshan Live : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय वाटचालीत प्रथमच दिवसभराचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबई - मनसेच्या महाअधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नवीन झेंड्याचं अनावरण केलं आहे. हा नवीन झेंडा भगव्या रंगाचा असून त्यात राजमुद्रा वापरण्यात आली आहे. त्याचसोबत मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते या अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. 

अधिवेशन स्थळी चहापानापासून भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला आक्रमक हिंदुत्वाची भूमिका अडचणीची ठरेल असा दावा केला जात आहे. याच गृहितकातून मनसेने हिंदुत्वाची कास धरत हिंदुत्ववादी शिवसैनिकांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. - जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूंनो, भगिनींनो आणि मातानों; पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट

जसं माझ्या मतदार संघाचे प्रश्न विधानसभेत मांडेन तसंच माझ्या राज्यभरातील महाराष्ट्र सैनिकांचे प्रश्नही विधानसभेत तडफेने मांडेन. तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी एक नवी यंत्रणा मी उभी करत आहेत. तुमच्या सेवेस मनसेचा हा एकमेव आमदार तत्पर आहे - मनसे आमदार राजू पाटील- ते सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात, तर आम्ही सत्यासाठी का सोबत येऊ शकत नाही?- सुधीर मुनगंटीवार

- मनसे सरचिटणीस किशोर शिंदे यांनी दुसऱ्या सत्राला सुरुवात करत शहर व नियोजन यावर ठराव मांडला, यामध्ये घुसखोरांना देशाबाहेर हाकला, अनाधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यवस्थेला दणका देण्याची मोहीम राबविण्यात येईल असा ठराव मांडत अप्रत्यक्षपणे एनआरसीला पाठिंबा दिला आहे.  

- मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्याचा ठराव मांडला

- छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ध्वजामध्ये अंतर्भूत करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे ह्याची आम्हाला जाणीव आहे. मुघलांची आणि ब्रिटिशांची गुलामगिरीबद्दल बोललं जातं पण सव्वाशे वर्ष ह्या संपूर्ण भूप्रदेशावर मराठ्यांनी राज्य केलं हे आपण विसरतो - अनिल शिदोरे

- मनसेच्या मंचावर अमित ठाकरेंचं लॉन्चिंग, पक्षात मोठी जबाबदारी मिळणार

मनसेच्या महाअधिवेशनात पहिला ठराव -  

- कायद्याच्या कचाट्यात अडकलेले आपले सण निडरपणे साजरे झाले ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच - अविनाश अभ्यंकर

- आजवर पक्षाने अनेक स्थित्यंतरं पाहिली, अनेक निर्भीड राजकीय भूमिका घेतल्या, तडफेने आंदोलनं केली - अविनाश अभ्यंकर 

- ढोल ताशांच्या गजरात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण, राज ठाकरेंनी केलं नव्या झेंड्याचं अनावरण

- मनसेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं

- मनसेच्या नवीन झेंड्यावर असणार शिवरायांची राजमुद्रा?

- थोड्याच वेळात राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या नवीन झेंड्याचे होणार अनावरण

- मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा 

- राज ठाकरेंसह कुटुंबीय गोरेगाव नेस्को सेंटर येथे दाखल

टॅग्स :मनसेराज ठाकरेहिंदुत्व