मनसे नगरसेविका o्रद्धा पाटील पतीसह गजाआड
By Admin | Updated: August 22, 2014 00:42 IST2014-08-22T00:42:42+5:302014-08-22T00:42:42+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका o्रद्धा पाटील आणि त्यांचे पती राजेश यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गजाआड केले.

मनसे नगरसेविका o्रद्धा पाटील पतीसह गजाआड
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका o्रद्धा पाटील आणि त्यांचे पती राजेश यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गजाआड केले. पालिकेच्या कंत्रटदाराकडून पंधरा हजार रुपयांची लाच घेताना ही कारवाई केल्याचे एसीबीने सांगितले.
पाटील माहीममधील वॉर्ड क्रमांक 181च्या नगरसेविका आहेत, तर त्यांचे पती राजेश हेही मनसेचे पदाधिकारी आहेत. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदाराला पालिकेच्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत माहीमच्या नया नगर झोपडपट्टी आणि परिसरात साफसफाईचे कंत्रट मिळाले होते. त्यानंतर पाटील दाम्पत्याने या कंत्रटदाराकडे महिना दहा हजार रुपयांचा हफ्ता दे, अशी
मागणी सुरू केली. ती या कंत्रटदाराने धुडकावली. त्यामुळे रागाच्या भरात कंत्रटदार दिलेले काम व्यवस्थित करत नाही, अशी तक्रार नगरसेविका पाटील यांनी पालिकेच्या संबंधित विभागाकडे केली होती. पाटील दाम्पत्याकडून सतत होणा:या जाचाला कंटाळून कंत्रटदाराने एसीबीकडे तक्रार दिली. (प्रतिनिधी)