Join us

'आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची...'; राज ठाकरेंची मनसैनिकांना ताकीद

By मुकेश चव्हाण | Updated: December 21, 2022 21:39 IST

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्रक काढत कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत.

मुंबई- सध्या माध्यमांसमोर  किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स याच्याने हे सगळे शेफारले आहेत, अशा शब्दात मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी मनसैनिकांना तंबी दिली आहे. राज ठाकरेंनी फेसबुकवर एक पत्रक शेअर करत सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताकीद दिली आहे. 

राज ठाकरे म्हणाले की, माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला, पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा, पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे, हे लक्षात ठेवा, असं म्हणत ही समज नाही, तर अंतिम ताकीद आहे, याची नोंद घ्या, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसे