Join us  

Raj Thackeray: मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 6:27 PM

Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्यावर कंबरेजवळच्या स्नायूची शस्त्रक्रिया होत आहे. त्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. (mns cheif raj thackeray admitted in lilavati hospital)

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत राज्यातील सर्व महत्वाच्या राजकीय पक्षांचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीला राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. पण ते रुग्णालयात दाखल असल्यानं ते बैठकीला उपस्थित राहू शकलेले नसल्याचं कळतं. 

राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. उपचारासाठी राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात एमआरआय चाचणी केली होती. आज त्या स्नायूवर छोटी शत्रक्रिया करण्यात येणार होती. फार गंभीर बाब नसून शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्या दिवशीच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

टेनिस खेळतानाही झाली होती दुखापतराज ठाकरे हे क्रीडा प्रेमी आहेत. जानेवारी महिन्यात टेनिस खेळताना त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यांच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याची माहिती तेव्हा समोर आली होती. त्यानंतर पक्षाच्या बैठकीवेळीही राज ठाकरे उपस्थित असताना हाताला प्लास्टर केलेलं असल्याचं दिसून आलं होतं.

राज्यात कडक लॉकडाऊनची तयारी?वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तरीही रुग्णसंख्या कमी होत नसल्यामुळे राज्य सरकार आता कडक लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहे. यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याचं ठाम मत व्यक्त केलं आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसे