राइट टू पी चळवळीला मनसे, भाजपाचा पाठिंबा
By Admin | Updated: October 5, 2014 00:55 IST2014-10-05T00:55:08+5:302014-10-05T00:55:08+5:30
दिवसाचा बहुतांश वेळ घराबाहेर राहत असणा:या महिलांना लघुशंकेसाठी शहरामध्ये मोफत, स्वच्छ, सुरक्षित, सार्वजनिक मुता:या असण्याची आवश्यकता आहे.

राइट टू पी चळवळीला मनसे, भाजपाचा पाठिंबा
>मुंबई : शहरांमध्ये महिला नोकरी, व्यवसायासाठी मोठय़ा संख्येने बाहेर पडतात. दिवसाचा बहुतांश वेळ घराबाहेर राहत असणा:या महिलांना लघुशंकेसाठी शहरामध्ये मोफत, स्वच्छ, सुरक्षित, सार्वजनिक मुता:या असण्याची आवश्यकता आहे. मात्र मुंबईमध्ये अशा मुता:याच नसल्यामुळे येणा:या नवीन सरकारने या गंभीर समस्येची दखल घ्यावी, म्हणून राइट टू पी कार्यकत्र्यानी काही नेत्यांची भेट घेतली आहे. काही जणांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून काही जणांकडून अद्याप काहीच प्रतिसाद मिळालेला नाही.
गेल्या तीन वर्षापासून आरटीपी चळवळ सुरू झाली आहे. मुंबई शहरामध्ये महिलांसाठी एकही मोफत मुतारी नाही. महिलांना त्यांचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी ही चळवळ उभी राहिली होती. गेली 3 वर्षे ही चळवळ सुरू आहे. मात्र अजूनही या मोहिमेला हवे तितके यश मिळालेले नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष आपले जाहीरनामे जाहीर करतात.
यामध्ये महिला मुता:यांचा प्रश्न यावा, म्हणून आरटीपी कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांना भेटले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली, ती भेट सकारात्मक झाली. जेव्हा राज ठाकरे यांच्या समोर आम्ही आमचा प्रश्न मांडला, पत्र दिले. तेव्हा राज यांनी सांगितले की, माङो आमदार हे या विषयावर काम करत आहेत. माङया ब्ल्यू प्रिंटमध्येदेखील महिला मुता:यांचा उल्लेख आहे. हे काम करण्याचे आश्वासन राज यांनी दिल्याचे आरटीपी कार्यकत्र्या मुमताज शेख यांनी सांगितले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची भेटही सकारात्मक झाल्याचे आरटीपी कार्यकत्र्यानी सांगितले. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आमची सत्ता आल्यास पुढच्या दीड वर्षात
आम्ही हा प्रश्न पूर्णपणो सोडवू. केंद्रामध्येही हा प्रश्न नेल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडून मात्र ठोस उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. महिला मुता:या हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यामुळेच इतर राजकीय पक्षांनीही आमच्या प्रश्नाचा विचार केला पाहिजे, असे आवाहन आता आरटीपी चळवळीकडून सर्व पक्षांना करण्यात आले आहे, असे मुमताज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)