मनसे, आप, बसपा, सपाचे डिपॉझिट गुल

By Admin | Updated: May 17, 2014 02:25 IST2014-05-17T02:25:58+5:302014-05-17T02:25:58+5:30

नमो नावाच्या झंझावाती वादळासमोर मुंबईतील महाराष्टÑ नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या दिग्गज नेत्यांचे डिपॉझिट गुल झाले आहे.

MNS, AAP, BSP, Deposits of SP | मनसे, आप, बसपा, सपाचे डिपॉझिट गुल

मनसे, आप, बसपा, सपाचे डिपॉझिट गुल

मुंबई : नमो नावाच्या झंझावाती वादळासमोर मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या दिग्गज नेत्यांचे डिपॉझिट गुल झाले आहे. मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांना पाठिंबा असेल, अशी भूमिका घेणार्‍या मनसेचे विधानसभा गटनेते बाळा नांदगावकर, ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर, मयांक गांधी, प्रा. मच्छिंद्र चाटे, अभिनेते महेश मांजरेकर यांचा यात सहभाग आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक अर्ज दाखल करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला २५ हजार, तर अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवावी लागते. निवडणूक हरल्यानंतर ती परत मिळवण्यासाठी उमेदवाराला त्यांच्या मतदारसंघातील एकूण मतदानाच्या एकषष्ठांश मतदान मिळवणे आवश्यक असते. नाही तर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की सहन करावी लागते.

Web Title: MNS, AAP, BSP, Deposits of SP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.