आमदारांनी घेतली तीन वेळा शपथ

By Admin | Updated: August 17, 2014 01:18 IST2014-08-17T01:18:38+5:302014-08-17T01:18:38+5:30

मुंबई प्रांत विधानसभेच्या दुस:या नवनिर्वाचित सदस्यांनी अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत. मार्च 1946 ते एप्रिल 1952 हा कालखंड होता.

MLAs take oath three times | आमदारांनी घेतली तीन वेळा शपथ

आमदारांनी घेतली तीन वेळा शपथ

>मुंबई प्रांत विधानसभेच्या दुस:या नवनिर्वाचित सदस्यांनी अनेक ऐतिहासिक  क्षण अनुभवले आहेत. मार्च 1946 ते एप्रिल 1952 हा कालखंड होता. गमतीशीर प्रसंग म्हणजे या सदस्यांनी आमदारपदाची (सदस्यत्वाची) तीन वेळा शपथ घेतली होती. आपण ब्रिटिश संसदीय पद्धत स्वीकारल्यापासून अधिकार आणि गुप्ततेची शपथ घेण्याची प्रथा स्वातंत्र्यापूर्वीपासून अस्तित्वात आली आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात इंग्लंडच्या राजाला उद्देशून शपथ घ्यावी लागत होती, तशी ती घेण्यात आली होती. 15 ऑगस्ट रोजी देश स्वतंत्र झाला. इंग्रजांचा आता संबंध राहिला नाही. आपण स्वतंत्र झालो आहोत; त्यामुळे आपल्या देशाला उद्देशून शपथ घ्यावी, अशी मागणी काही सदस्यांनी केली आणि मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी ती मान्य केली. त्यामुळे 24 सप्टेंबर 1947 पासून दुस:यांदा सर्व सदस्यांनी शपथ घेतली.
घटना समितीने भारतीय प्रजासत्ताकाची राज्यघटना तयार केली. ती स्वीकारून 26 जानेवारी 195क् रोजी जारी करण्यात आली. घटनेमध्ये राज्य विधानसभा, लोकसभा आणि निवडणुका, आदींची कार्यपद्धती निश्चित केली होती. शिवाय राज्यघटनेनुसार लोकसभा किंवा विधानसभेच्या सदस्यांना राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे काही सदस्यांनी मागणी केली की, राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी. त्यानुसार दुस:या विधानसभेच्या सदस्यांनी तिस:यांदा शपथ घेतली.  विधानसभा सदस्य अशा प्रसंगांचे साक्षीदार बनले.
शपथविधीशिवाय अनेक प्रसंग यानिमित्त इतिहासात नोंदविले गेले आहेत. त्यांची माहिती घेतल्याशिवाय आपल्या विधानसभेच्या वाटचालीचे सिंहावलोकन पूर्ण होणार नाही. याच सभागृहाने द्विभार्या प्रतिबंधक कायदा, कूळवहिवाट कायद्यासारखे महत्त्वाचे निर्णय तर घेतलेच; शिवाय घटना तयार करणा:या समितीवरही प्रतिनिधित्व केले. मुंबई विद्यापीठ एकमेव होते. गुजरात विद्यापीठ, पुणो आणि एसएनडीटी विद्यापीठासारख्या संस्था उभारण्याचाही निर्णय या सभागृहाने घेतला. शिवाय अनेक ऐतिहासिक क्षणांचेही हे सभागृह साक्षीदार राहिले. पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला. स्वतंत्र भारतातील महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन याच सभागृहाने अनुभवले (1क् सप्टेंबर 1947, पुणो). पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये भरलेल्या अधिवेशनात 6 ऑक्टोबर 1949 रोजी भाषण झाले होते. त्यांचे राज्य विधानसभेत होणारे हे पहिलेच भाषण होते.
दुसरी निवडणूक मार्च 1946 मध्ये झाली होती. तेव्हा सदस्यसंख्या 175 होती. 1949 मध्ये संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन झाल्यानंतर त्या-त्या संस्थानांना विधानसभेत प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आताच्या गुजरातमधील पाच, महाराष्ट्रातील नऊ, कर्नाटकातील जमखंडी अशा पंधरा सदस्यांचे 62 प्रतिनिधी विधानसभेवर नियुक्त करण्यात आले. ही व्यवस्था फक्त याच सभागृहापुरती होती. 1952 पासून नवमतदारसंघ रचनेनुसार लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना सदस्यत्व दिले व संस्थानचे रद्द केले. महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, जत, कुरुंदवाड, सावंतवाडी, भोर, औंध-फलटण, जंजिरा आणि अक्कलकोट, आदी संस्थानांचा यांत समावेश होता.
बडोदा संस्थान मोठे असल्याने त्याचे 24 प्रतिनिधी होते. त्याखालोखाल कोल्हापूरचे आठ होते. जमखंडीतून बी. डी. जत्ती होते. पुढे ते कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि देशाचे उपराष्ट्रपती झाले. या सर्व सदस्यांचा शपथविधी समारंभ 9 सप्टेंबर 1949 रोजी पुण्यात सुरू असलेल्या अधिवेशनात पार पडला. याच विधानसभेच्या कार्यकाळात ब्रिटिशांची सत्ता गेल्यानंतर नियुक्त केलेल्या पहिल्या मुंबई प्रांताच्या राज्यपालांचे अभिभाषणही विधिमंडळाच्या संयुक्त सभेत 19 ऑक्टोबर 1948 रोजी झाले. पहिले राज्यपाल राजा महाराज सिंग होते. विधिमंडळाच्या अभिभाषणाची सुरुवातही या भाषणाने झाली.
- वसंत भोसले
(उद्या : स्वतंत्र भारतातील वाटचालीचा प्रारंभ)

Web Title: MLAs take oath three times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.