मुंबई - गोरेगाव पूर्व आरे कॉलनीतील नागर मोडी पाडा, आंबेवाडी येथे राहणाऱ्या 4 वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्काराची दुर्दैवी घटना घडली. सदर पीडित मुलीवर सध्या कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान, वर्सोवा विधानसभा मतदार संघाच्या आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी घटनास्थळी जाऊन पिडीत कुटुंबाची भेट घेतली. महाआघाडीचे तीन पक्षांचे सरकार चालवतांना मुख्यमंत्र्यांची कसरत होत असल्याने,महिलांच्या सुरक्षिततेकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे अशी टीका त्यांनी केली.महिलांच्या सुरक्षिततेकडे जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे लव्हेकर म्हणाल्या.यावेळी आरोपीवर कडक कायदेशीर करवाई करावी अशी मागणी देखिल आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. यावेळी नगरसेवक योगीराज दाभाडकर,नगरसेविका रंजनाताई पाटील तसेच अभिषेक सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष सुनीता नागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आरेतील पीडित आदिवासी मुलीच्या कुटुंबाची आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 19:29 IST