Join us
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिण्याच्या वादातून मित्राची हत्या; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 04:31 IST

माहीम येथे दारु पिण्याच्या वादातून दोघांनी मित्राची हत्या केली आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी संजय बटलर (२७), आकाश शर्मा (३0) यांना अटक केली आहे.

मुंबई : माहीम येथे दारु पिण्याच्या वादातून दोघांनी मित्राची हत्या केली आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी संजय बटलर (२७), आकाश शर्मा (३0) यांना अटक केली आहे.माहीम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये माणिक हीरप्पा सुरदन उर्फ पंकज सुजराम (४४) याचा मृत्यू झाला आहे. तिघेही पदपथावर राहणारे आहेत. ११ जानेवारीला ते दारु पार्टी करत होते. सुजराम तेथून जात होता. त्यावेळी दोघांनी त्याला आणखी दारू पाजण्यास सांगितले. मात्र, नकार देताच, दोघांनी त्याला मारहाण केली. दुसऱ्या दिवशीही पुन्हा यावरुन वाद झाला. वादाची परिणीती पुन्हा मारहाणीत झाली. या मारहाणीत बेशुद्ध झालेल्या सुजरामला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान १५ जानेवारीला सुजरामचा मृत्यू झाला.हत्येचा गुन्हा दाखल करुन माहीम पोलिसांनी दोन्ही मित्रांचा शोध सुरु केला. तपासाअंती पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.