Join us  

मिठी नदी प्रदूषणमुक्त होणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 2:16 AM

मिठी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी गेल्या चार वर्षांमध्ये मोठी मोहीम राबविण्यात आली आहे.

मुंबई : मिठी नदीप्रदूषणमुक्त करण्यासाठी गेल्या चार वर्षांमध्ये मोठी मोहीम राबविण्यात आली आहे. यामुळे पुराची भीती दूर झाली आहे. भविष्यात मुंबई शहर पुरापासून सुरक्षित राहिल, असा विश्वास पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.मिठी नदी १८ कि.मी. लांब असून आतापर्यंत १६ कि.मी. पर्यंत सात फूट खोलीकरण केले आहे. २० मीटरपासून १०० मीटरपर्यंत रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या परिसरात असलेल्या पाच हजार झोपड्यांपैकी चार हजार ३८८ झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. या नदीच्या दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधली असून मल-जल वाहिन्या टाकल्या आहेत. नदीच्या भरतीप्रवण क्षेत्रात समुद्राचे पाणी येऊ नये म्हणून बंधारा बांधण्यात येणार आहे. पाच पुलांचे बांधकाम केले आहे़, अशी माहिती कदम यांनी दिली.नागरिकांनी नदी-नाल्यात प्लास्टिकच्या वस्तू, घरातील कचरा टाकू नये. सांडपाणी सोडू नये म्हणून जनतेचे प्रबोधन करण्यावर भर देण्यात येत आहे, असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वरही उपस्थित होते.

टॅग्स :प्रदूषणनदी