Join us  

मीठी नदीच्या स्वच्छतेसाठी दोन अवलिया सरसावले, सुमारे तीस आठवड्यांपासून सुरू आहे सफाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 2:53 AM

मीठी नदीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून नदी पूर्णपणे दुषित होऊन मृत झाली आहे.

मुंबई : मीठी नदीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून नदी पूर्णपणे दुषित होऊन मृत झाली आहे. नदीला पुन्हा पुर्नजीवीत करण्यासाठी दोन अवलिया पुढे सरसावले आहेत. वर्सोवा बीचचे स्वच्छता दूत अफरोज शहा आणि बीच प्लीच मोहिमेचा संस्थापक मल्हार कळंबे या दोघांनी मीठी नदी स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे. अफरोज शहा गेल्या ३२ आठवड्यापासून तर मल्हार कळंबे हा ३१ आठवड्यांपासून स्वच्छता मोहिम राबवित आहे. अफरोज शहा पवई याठिकाणी तर मल्हार कळंबे माहिम खाडी परिसरात मिठी नदीची दर रविवारी स्वच्छता करतात.बीच प्लीज मोहिमेचा संस्थापक मल्हार कळंबे यांनी यासंदर्भात सांगितले की, मीठी नदीमध्ये सर्वाधिक कचरा हा धारावी झोपडपट्टी परिसरातून टाकला जातो, असे येथील स्थानिक रहिवासी सांगतात. समुद्रात जाणारा कचरा थांबविण्यासाठी नदी आणि समुद्र ज्याठिकाणी एकरूप होतात. तिथे जाळ््यांचे संरक्षण लावणे गरजेचे आहे; जेणेकरून नदीतून येणारा कचरा एकाच ठिकाणी जमा होईल आणि कचरा गोळा करायलाही सोपे जाईल. मीठी नदीमध्ये प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात आढळतो. ९० टक्के मायक्रो प्लॅस्टिकचे प्रमाण आहे. समुद्रात मायक्रो प्लॅस्टिक गेल्यावर ते प्लॅस्टिक मासे खातात आणि मरण पावतात. मीठी नदीच्या पात्रात उघड्यावर शौच करणाऱ्यांची सर्वाधिक संख्या आहे. नागरिक मीठी नदीच्या स्वच्छते मोहिमेला हातभार लावण्यासाठी पुढे येत नाही. दर रविवारी नदीलगत राहणाºया नागरिकांच्या घरी जाऊन कचरा व्यवस्थापनाची माहिती स्वयंसेवक देतात. आतापर्यंत ११० टन कचरा मीठी नदीतून जमा करण्यात आला आहे.वर्सोवा बीचचे स्वच्छता दूत अफरोज शहा यांनी सांगितले की, नोव्हेंबर २०१८ पासून मीठी नदीमध्ये स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. नदीमध्ये मल्टीलेअर पॅकेजिंगचा प्लॅस्टिक कचरा जास्त आढळून येतो. मीठी नदीजवळ राहणारे चाळीतील व झोपडपट्टीतील रहिवासी हे छोट्या पॅकिंगमधल्या वस्तू खरेदी करतात. एकदा वस्तूचा वापर झाल्यावर थेट कचरा नदीमध्ये फेकला जातो. छोटे प्लॅस्टिक नदीमध्ये प्रचंड प्रमाणात आढळतात. दर रविवारी दोन तास स्वच्छता मोहिम राबविली जाते.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभागमोहिमेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था व संघटना आदींचा सहभाग असतो. पुढील दोन तासाच्या काळावधीत पाच जणांचा एक ग्रुप तयार करून प्रत्येक घरामध्ये जाऊन रहिवाशांनी जमा केलेला कचरा रिसायकलिंगकरिता एकत्र केला जातो. ३२ आठवड्यामध्ये रहिवाशांकडून प्रत्येक दिवशी २५० किलो कचरा गोळा केला जातो. सध्या फिल्टरपाड्यामध्ये कचरा जमा करण्याचे काम सुरू आहे. ओला कचरा आणि सुका कचरा कसा वेगळा करायचा याचे प्रशिक्षण दिले जाते. 

टॅग्स :नदीमुंबई