आयएसआय मार्कचा दुरुपयोग;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:07 IST2021-07-29T04:07:42+5:302021-07-29T04:07:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आयएसआय मार्कचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोने मोहीम हाती घेतली असून, या ...

आयएसआय मार्कचा दुरुपयोग;
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयएसआय मार्कचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोने मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेंतर्गत मुंबई शाखेच्या कार्यालय दोन मधील अधिकारी टी. अर्जुन आणि विवेक रेड्डी यांनी भिवंडी येथील हरिओम प्लायवूड प्रोडक्टसवर केलेल्या कारवाईत आयएसआय मार्कचा दुरुपयोग केल्याप्रकरणी प्लायवूडचे २४ हजार ६०० नग जप्त केले आहेत.
बीएसआय स्टँडर्ड मार्कचा दुरुपयोग केल्याप्रकरणी दोन वर्षांची कैद अथवा दोन लाखांचा दंड अथवा दोन्ही होऊ शकते. परिणामी अशा स्वरुपाच्या कारवाया टाळायच्या असतील तर आयएसआय मार्कचा दुरुपयोग टाळावा, असे आवाहन भारतीय मानक ब्युरोने केले आहे. आयएसआय मार्कचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणावर नफा कमाविण्यासाठी केला जातो. मात्र हे गैर आहे. परिणामी अशा उत्पादनांच्या खरेदीपूर्वी वास्तविकता तपासावी. शिवाय ग्राहकांनीदेखील जागृत रहावे, असे आवाहन भारतीय मानक ब्युरोने केले आहे.