विनयभंग करणारा डॉक्टर अटकेत

By Admin | Updated: March 30, 2016 02:37 IST2016-03-30T02:37:19+5:302016-03-30T02:37:19+5:30

दाताच्या उपचारासाठी गेलेल्या २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला मंगळवारी भोईवाडा पोलिसांनी अटक केली. डॉ. अजित अविनाश बुडके (३५) असे अटक

Missing molestant doctor | विनयभंग करणारा डॉक्टर अटकेत

विनयभंग करणारा डॉक्टर अटकेत

मुंबई : दाताच्या उपचारासाठी गेलेल्या २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला मंगळवारी भोईवाडा पोलिसांनी अटक केली. डॉ. अजित अविनाश बुडके (३५) असे अटक आरोपीचे नाव असून त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. तपासणीच्या बहाण्याचे बुडकेने तरुणीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली होती. हा प्रकार कुटुंबियांना सांगून याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तरुणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपासानंतर त्याला अटक केली असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांनी दिली.

Web Title: Missing molestant doctor