अमर शैला -
मुंबई : मुंबई-पुणे अंतर कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पातील २३.५ मीटर रुंदीचा बोगदा जगातील सर्वांत रुंद बोगदा ठरणार आहे. त्यामुळे त्याचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रयत्न सुरू केले आहेत. ‘एमएसआरडीसी’ने त्याचा अर्ज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद ठेवणाऱ्या समितीकडे पाठविल्यानंतर समितीने प्रत्यक्ष पाहणीही पूर्ण केली आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाची ‘नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये होण्याची शक्यता आहे.
मुंबई ते पुण्यादरम्यान यशवंतराव चव्हाण महामार्गावरून सध्या खंडाळा घाटातून प्रवास करावा लागतो. या ठिकाणी अनेकदा वाहतूक कोंडी होते. यावर पर्याय म्हणून खोपोली एक्झिट ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गिकांचे दोन बोगदे बांधण्यात येत आहेत. त्यातील सर्वांत मोठ्या बोगद्याची लांबी ८.७ किलोमीटर आहे, तर दुसरा बोगदा १.६७ किमीचा आहे. प्रत्येक बोगद्यात वाहतुकीसाठी चार मार्गिका आणि एक सर्व्हिस लेन असणार आहे. त्यासाठी २४ मीटर रुंदीचे भुयारीकरण केले असून, बोगदा पूर्ण झाल्यानंतरची त्याची रुंदी २३.५ मीटर आहे. हा बोगदा जगातील सर्वांत रुंद बोगदा आहे. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्यासाठी एमएसआरडीसीने सहा महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठविला आहे, असे एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, मिसिंग लिंक प्रकल्पातील केबल स्टेड पूल ९५० मीटर लांबीचा आहे. तो जमिनीपासून १०० मीटर उंचीवर आहे. त्याची संपूर्ण उंची १८३ मीटर आहे. प्रतितास २५० कमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यापुढे टिकाव धरण्याची या पुलाची क्षमता आहे.
प्रकल्पाचा खर्च ६,६९५ कोटी रु.प्रकल्पातील मार्गाची लांबी १३.३ किमी मुंबई पुण्यादरम्यान कमी होणारे अंतर ६ किमीप्रवासाच्या वेळेत बचत २५ मिनिटे
१ मे रोजी मार्ग सुरू होणारएमएसआरडीसीने बोगद्याची कामे पूर्ण केली आहेत. आता या प्रकल्पातील केबल स्टेड पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही कामे पुढील महिन्यात पूर्ण करून मार्ग १ मे रोजी सुरु करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे.
‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकाऱ्यांनी मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली आहे. आता प्रकल्पातील जगातील सर्वांत रुंद बोगद्याचा समावेश गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरु केली आहे.अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी
Web Summary : The Missing Link project's 23.5-meter wide tunnel, set to be world's widest, is seeking Guinness recognition. MSRDC applied, inspection complete; record likely soon. The project reduces Mumbai-Pune distance.
Web Summary : मिसिंग लिंक परियोजना की 23.5 मीटर चौड़ी सुरंग, दुनिया की सबसे चौड़ी सुरंग बनने के लिए गिनीज में शामिल होने की तैयारी में है। एमएसआरडीसी ने आवेदन किया, निरीक्षण पूरा; रिकॉर्ड जल्द ही संभावित है। यह परियोजना मुंबई-पुणे की दूरी कम करती है।