चेंबूरमध्ये तरुणीचा विनयभंग
By Admin | Updated: June 18, 2017 02:46 IST2017-06-18T02:46:22+5:302017-06-18T02:46:22+5:30
उपचारावेळी तरुणीशी अश्लील वर्तन करणाऱ्या एका डॉक्टरला चेंबूर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. डॉ. सुभाष सेहगल (६४) असे या आरोपी डॉक्टरचे नाव असुन,

चेंबूरमध्ये तरुणीचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उपचारावेळी तरुणीशी अश्लील वर्तन करणाऱ्या एका डॉक्टरला चेंबूर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. डॉ. सुभाष सेहगल (६४) असे या आरोपी डॉक्टरचे नाव असुन, तो चेंबूर परिसरातच राहणारा आहे.
मानखुर्द परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीला गेल्या अनेक महिन्यांपासून मासिक पाळीचा त्रास होता. त्यामुळे ती गेल्या काही महिन्यांपासून ती चेंबूर कॅम्प पारिसरात असलेल्या एका लायन्स क्लबमध्ये उपचार घेत होती. याच ठिकाणी हा डॉक्टर रुग्णांच्या तपासणीसाठी येत होता. दरम्यान बुधवारी सायंकाळी देखील ही तरुणी याठिकाणी गेली असता डॉक्टरने तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप तिने केला आहे. तशी तक्रार तिने गुरुवारी चेंबूर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार चेंबूर पोलिसांनी या डॉक्टरला त्याच दिवशी अटक केली. सद्यस्थितीमध्ये हा डॉक्टर न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती चेंबूर पोलिसांनी दिली आहे.