बेपत्ता चिमुरडीचा सापडला मृतदेह

By Admin | Updated: May 11, 2017 02:30 IST2017-05-11T02:30:05+5:302017-05-11T02:30:05+5:30

दोन दिवसांपासून बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह मंगळवारी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरे परिसरात चार वर्षांची चिनू

Missing body found in chimari | बेपत्ता चिमुरडीचा सापडला मृतदेह

बेपत्ता चिमुरडीचा सापडला मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दोन दिवसांपासून बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह मंगळवारी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरे परिसरात चार वर्षांची चिनू (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. ८ मे रोजी घराबाहेर खेळत असताना ती गायब होती. बराच वेळ शोध घेऊनही तिचा शोध लागला नव्हता.
चिनूच्या कुटुंबीयानी आरे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार आरे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला. गुन्हे शाखाही याचा समांतर तपास करत होते. रविवारी आरेच्या जंगलात शोध सुरु केला. त्याच दरम्यान तिचा मृतदेह आढळून आला. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Web Title: Missing body found in chimari