Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुरुदेवजींच्या आशीर्वादामुळं चमत्कार, माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, महापौर तावडेंचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 00:00 IST

मुंबईच्या भाजपच्या महापौर रितू तावडे यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. गुरुदेवजींच्या चमत्कारामुळेच माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, असे वक्तव्य रितू तावडे यांनी केले आहे.

मुंबईच्या भाजपच्या महापौर रितू तावडे यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. गुरुदेवजींच्या चमत्कारामुळेच माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, असे वक्तव्य रितू तावडे यांनी केले आहे. महावीर जयंती निमित्त बोरोवली कोरा केंद्र मैदानात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सध्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण चर्चेत आहे. आता तावडे यांच्या या विधानामुळे जोरदार चर्चा सुरू आहेत.

"दीड ते दोन वर्षांपासून मला घशाची समस्या होती. मी गुरुजींना सांगितले की आवाजाची समस्या आहे. मी औषधं घेत आहे. परंतु काहीही फरक परत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी आशीर्वाद दिला आज मी स्पष्ट बोलत आहे. हा मोठा चमत्कार असल्याचे विधान  महापौर रितू तावडे यांनी केले आहे. आज माझा आवाज तुम्ही ऐकत आहात. खूपच सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळत आहे असे रितू तावडे म्हणाल्या.

भगवान महावीर यांचा अहिंसेचा मार्ग आपल्याला दिसत आहे.  दीड वर्षांपासून मी ज्या घशाच्या समस्येने त्रस्त होते, पण गुरुजींनी आशीर्वाद दिल्याने मी आज तुमच्यासमोर असं बोलू शकत असल्याचे तावडे म्हणाल्या. तावडे यांच्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Miracle! Gurudev's Blessings Cured Throat Problem: Mayor Tawade's Statement

Web Summary : Mumbai Mayor Ritu Tawade claims Gurudev's blessings cured her throat problem. She suffered for two years, but after his blessings, she can speak clearly and feels positive energy. Her statement sparks discussion amidst controversies surrounding self-proclaimed godmen.
टॅग्स :रितू तावडे