मिनीट्रेनचे इंजीन पुन्हा घसरले
By Admin | Updated: January 17, 2015 23:10 IST2015-01-17T23:10:00+5:302015-01-17T23:10:00+5:30
माथेरानला जाण्यासाठी पर्यटक आवर्जून मिनीट्रेनला पसंती देतात. त्यासाठी तासन्तास तिकिटाच्या रांगेतही उभे असतात. त्या माथेरानच्या राणीला सध्या ग्रहण लागले आहे.

मिनीट्रेनचे इंजीन पुन्हा घसरले
कर्जत : माथेरानला जाण्यासाठी पर्यटक आवर्जून मिनीट्रेनला पसंती देतात. त्यासाठी तासन्तास तिकिटाच्या रांगेतही उभे असतात. त्या माथेरानच्या राणीला सध्या ग्रहण लागले आहे. मिनीट्रेनचे इंजीन शुक्रवारी रुळावरून घसरले. त्यामुळे माथेरान-नेरळ मिनीट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली.
मिनीट्रेनचे इंजीन रुळावरुन घसरण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. माथेरान येथून नेरळसाठी दुपारी १२.५० वाजता मिनीट्रेन माथेरान स्थानकातून निघते. शुक्रवारी माथेरान स्थानकात ही मिनीट्रेन विश्रांती स्थळावरून येण्यास निघाली असता तिचे इंजीन घसरले. यावेळी नेरळकरिता प्रवास करण्यासाठी तब्बल ७० प्रवाशांनी तिकिटे काढली होती आणि ते मिनीट्रेनच्या प्रतीक्षेत होते. मात्र इंजीन घसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. रुळावरून उतरलेले इंजीन त्वरित उचलण्याची कोणतीही व्यवस्था माथेरान स्थानकात नसल्याने नेरळ लोको शेडमधून यंत्र साहित्य येईपर्यंत कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनाही वाट पाहावी लागली. (वार्ताहर)